10 वर्षांचा प्रवास संपला, मनमोहन सिंग यांनी दिला राजीनामा

May 17, 2014 3:54 PM0 commentsViews: 881

776pm_by

17 मे : गेली दहा वर्ष देशाचं पंतप्रधान भुषवणारे डॉ. मनमोहन सिंग यांनी आज आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.  दुपारी एकच्या सुमारास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटून आपला राजीनामा सोपवला. त्यांच्यासोबत संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ होते. सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्राला उद्देशून सकाळी शेवटचं भाषण केलं.

यात त्यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याविषयी आशा व्यक्त केली. तसंच त्यांनी देशातील्या जणतेचे त्यांनी आभार मानले. जनतेनं दिलेल्या कौलाचा आम्ही आदर करतो. देशाच्या उज्ज्वल भविष्याविषयी मला विश्वास आहे. माझं आयुष्य एका उघड्या पुस्तकासारखं आहे. या देशाचा पंतप्रधान होणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मला विश्वास आहे की, येणारे सरकार आपल्या कामाच यशस्वी ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात 15 वी लोकसभा विसर्जित करण्याचा ठराव मंजूर झाला. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांच्या आभाराचा प्रस्तावही मांडण्यात आला. आज संध्याकाळी पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातल्या सहकार्‍यांसाठी डिनर आयोजित केलंय. दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीची सोमवारी बैठक होणार आहे. पक्षाच्या दारुण पराभवावर या बैठकीत चर्चा होणार आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी राजीनामा देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close