मनसेचा सुपडा साफ, सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

May 17, 2014 5:41 PM2 commentsViews: 7168

98raj_thakarey_417 मे : ‘मनसेची औकात दाखवून देईन’ अशी गर्जना करुन लोकसभा निवडणुकीत उतरलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तोंडघशी पडले. नरेंद्र मोदींच्या त्सुनामीमुळे मनसेचं इंजिन घसरलंय. मनसेच्या सर्वच्या सर्व म्हणजे दहा लोकसभा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय. त्याचबरोबर मनसेला मिळणार्‍या मतांचा टक्काही घसरला आहे. या निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसला आहे.

मनसे लोकसभा लढवणार की नाही यावरुन सस्पेन्स निर्माण झाला होता पण राज यांनी वेगळी खेळी खेळत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करत लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. आमचे उमेदवार निवडून आले तर नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील अशी भूमिकाच राज यांनी मांडली होती. ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहे त्याच ठिकाणी मनसेनं आपले उमेदवार उतरवले पण एकाही जागी मनसेचा उमेदवार निवडून आला नाही.

एवढंच नाही तर प्रचार सभेत ‘चिकन सूप, बडाडेवडे’, ‘परप्रांतीयांना परत मारीन’ असं राजकारणही राज यांनी केलं. मनसेचे बडे नेते बाळा नांदगावकर यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईतील सर्वच जागांवर मनसेचे उमेदवार पडले. त्यापाठोपाठ पुणे, नाशिक, कल्याण, ठाणे इथले उमेदवारही मोठ्या संख्याने पराभूत झाले. त्यामुळे आता विधानसभेच्या आखाड्यात मनसेला ताकही फूकुन प्यावे लागणार अशीच परिस्थिती निर्माण झालीय.

मनसेच्या उमेदवारांना किती मतं मिळाली

दक्षिण मुंबई – बाळा नांदगावकर – 84,773 मतं मिळाली, इथं सेनेचे अरविंद सावंत 3,74,609 मतांनी विजयी
दक्षिण मध्य मुंबई – आदित्य शिरोडकर – 73,113 मतं मिळाली, इथं सेनेचे राहुल शेवाळे 3,81,275 मतांनी विजयी
उत्तर पश्चिम मुंबई – महेश मांजरेकर – 66,088 मतं मिळाली, इथं सेनेचे गजानन किर्तीकर 4,64,820 मतांनी विजयी
कल्याण – राजीव पाटील – 1,22,349 मतं मिळाली, इथं सेनेचे डॉ.श्रीकांत शिंदे 4,40,892 मतांनी विजयी
शिरूर – अशोक खंडेभराड – 3,64,48 मतं मिळाली, इथं सेनेचे शिवाजी आढळराव पाटील 6,43,415 मतांनी विजयी
पुणे – दीपक पायगडे – 93,502 मतं मिळाली, इथं सेनेचे अनिल शिरोळे 6,43,415 मतांनी विजयी
नाशिक – डॉ.प्रदीप पवार – 63,050 मतं मिळाली,इथं महायुतीचे हेमंत गोडसे 4,94,735 मतांनी विजयी

कसं होतं डिपॉझिट जप्त ?

डिपॉझिट वाचवण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक षष्ठमांश म्हणजे 16.6 टक्के मतं आवश्यक होती. पण मनसे आणि आपच्या उमेदवारांना तेवढीही मतं मिळु शकलेली नाहित. सर्वसाधारण/ ओबीसी उमेदवारांसाठी पंचवीस हजार रुपये अनामत रक्कम होती. तर एस.सी / एस .टी उमेदवारांसाठी साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sanjay

    MNS need to work hard. MNS need to define phrase maharashtrian. MNS need to have clear programme. Raj can do wonder……provided…….he works hard………..

  • Aquarian_Truth

    Who cares……………..a bigger Bol Bachan is now PM, who will ask Chota Bol Bachan now?

close