मोदी त्सुनामीचा तडाखा, नितीशकुमारांचा राजीनामा

May 17, 2014 6:42 PM0 commentsViews: 1771

76nitishkumar17 मे : नरेंद्र मोदी नावाच्या त्सुनामीचा तडाखा काँग्रेससह सर्वच पक्षांना बसला आहे. या तडाख्यामुळे बेजार झालेले नेते राजीनामा देत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपशी काडीमोड घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून आपला राजीनामा सोपवला आहे. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाही आहे.

लोकसभा निवडणुकीत जेडीयूला बिहारमध्ये 40 जागांपैकी फक्त 2 जागा पटकावता आल्या आहेत. तर भाजपने तब्बल 31 जागा जिंकून जेडीयूला धुळ चारली. त्यामुळे ही नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण राजीनामा देत असल्याचं नितीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन भावनांना वाट मोकळी करून दिली. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. असा काही निकाल येईल याचा विचार केला नव्हता.

या निवडणुकीत व्यक्तिगत टीका, वादग्रस्त विधान यामुळे गाजली आपल्या राजकीय कारकिर्दीत असा प्रकार पाहिला नाही. एनडीएने मोठ्या संख्येनं विजय मिळवला त्यांनी दिलेली आश्वासन पूर्ण करावी असा विश्वासही नितीशकुमार यांनी व्यक्त केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close