जाती-धर्माच्या राजकारणास युपीएत वाव नाही – सोनिया गांधी

April 10, 2009 9:35 AM0 commentsViews: 3

10 एप्रिलयुपीएचा मुद्दा विकासाचा असून जाती -धर्माचं राजकारण होऊ देणार नाही असा निर्धार सोनिया गांधी यांनी विदर्भात सकोलीतल्या सभेत केला. सोनिया गांधी त्यांच्या आजच्या विदर्भातल्या मॅरेथॉन दौ-यात चार सभा घेणार आहे. त्यातली पहिली सभा प्रफुल्ल पटेल यांच्या भंडारा-गोंदियातल्या साकोलीत झाली. राष्ट्रवादी-काँग्रेसची ती पहिलीच संयुक्त प्रचार सभा होती. त्यावेळी सोनिया गांधींनी सेना-भाजपवर कोट्या केल्या. विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या, युपीए सरकारने 65 हजार कोटींची कर्जमाफी दिली याची आठवणही सोनिया यांनी करून दिली. देशात दंगे घडवून आणणार्‍या पक्षांना आता थारा देऊ नका. जाती-जातींमध्ये द्वेष पसरवणार्‍या पक्षांपेक्षा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार्‍या काँग्रेस आणि युपीएच्याआघाडीची आज देशाल गरज असल्याचही सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. यावेळी बोलताना शेतकर्‍यांच्या प्रश्नाबरोबरच या देशाची एकता-अखंडता कायम जपण्याचं काम काँग्रेसनेचं केलंय, ही आठवण सोनिया गांधी यांनी भाषणातून करून दिली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,राजेंद्र गवई,मुख्यमंत्री अशोक चव्हाण,माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख,रामदास आठवले, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. सर्वांनीच प्रफुल्ल पटेल यांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी केलं. साकोलीतल्या सभेत शरदपावारांचंही भाषण झालं. त्यावेळी सत्तेत असताना भाजपाला शेतकरी आणि त्यांची कर्ज आठवली नाहीत. आता ते आरडाओरडा करतायत. त्यांच्यावर आता किती विश्वास ठेवायचा, असा सवाल शरद पवारांनी केला. ज्यांच्या मंत्रिमंडळातील एका महिला मंत्र्याला दंग्यांप्रकरणी तुरुंगात जावं लागतं, अशा नरेंद्र मोदींच्या भाजपाला नैतिकतेची चाड नसल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. या भाषणात पंतप्रधानपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा घुमजाव केलं. शरद पवार पंतप्रधान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. तसंच राष्ट्रवादी युपीएसोबतआहे आणि युपीएमध्येच राहणार. तर मनमोहनसिंग पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल असं त्यांनी स्पष्ट केलंय.

close