राज्य सरकारने राजीनामा द्यावा -फडणवीस

May 17, 2014 9:51 PM0 commentsViews: 1101

17 मे : राज्य सरकारने पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नैतिकतेची चाड बाळगून तातडीने विधानसभा निवडणुकांना सामोरं जावं असं ही फडणवीस म्हणाले. भाजपच्या नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि मतदारांचे आभार मानले. जनतेनं दिलेला कौल सत्ताधार्‍यांनी मान्य करावा. त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा अशी विनंती फडणवीस यांनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close