रामदास कदमांनीच आपल्या विरोधात काम केलं-गीते

May 17, 2014 10:30 PM0 commentsViews: 4708

17 मे :निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाने सेना-भाजपमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आनंद व्यक्त केला. ही निवडणूक आपल्या आयुष्यातली सर्वात कठीण निवडणूक होती, रामदास कदम यांनीच आपल्या विरोधात काम केलं, असा थेट आरोप रायगडचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी केलाय. त्यांच्याबाबतचा निर्णय आता पक्ष श्रेष्ठीच घेतील असंही ते म्हणालेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close