गंगामातेनंच मला तुमचं बनवलंय -मोदी

May 17, 2014 11:57 PM1 commentViews: 1006

nmodimarried100414e

17 मे : भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा आज कौतुकाचा दिवस होता. दिल्लीत जंगी स्वागत झाल्यानंतर भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी वाराणसीत आले. त्यांनी गंगेच्या काठी दशाश्वमेध घाटावर गंगापूजा केली.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. गंगा आरतीच्या आधी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. गंगा आरतीनंतर त्यांनी गंगाघाटावर जमलेल्या लोकांशी संवाद साधला.मोदींनी वाराणसीतल्या मतदारांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी वाराणसीवासियांना गंगा स्वच्छ करण्याचं आश्वासन दिलंय.

तसंच वाराणसीला आध्यात्मिक राजधानी बनवण्याचंही आश्वासन दिलंय. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग आणि त्यांचे निकटवर्तीय अमित शाहसुद्धा यावेळी उपस्थित होते. राजनाथ सिंग सर्वात चांगले अध्यक्ष आहे असं कौतुकही मोदींनी केलं. त्या आधी सकाळी दिल्लीत भव्य रॅली निघाली. मोदी दिल्ली विमानतळावर येणार या अगोदरच विमानतळाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मोदींचं आगमन होता ‘मोदी…मोदी…’ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर एअरपोर्टपासून मोदींच्या गाड्यांचा भला मोठा ताफा निघाला.

यावेळी दोन्ही बाजूंचे रस्ते लोकांनी भरून गेले होते. मोदींच्या कारवर फुलांची उधळण होत होती. ही जंगी मिरवणूक भाजपच्या मुख्यालयापर्यंत पोहोचली. तिथं अगोदरच मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. भाजपच्या मुख्यालयाबाहेर भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मोदींचं जोरदार स्वागत केलं. यानंतर मोदींनी तिथंच एक छोटंसं भाषण केलं. त्यानंतर मोदी संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी भाजपच्या मुख्यालयात गेले. तिथं सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मोदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि एकमेकांना पेढेही भरवले. मोदींनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचा पायापडून आशीर्वाद घेतला. यानंतर मोदींनी मतदारांचे आभार मानले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • umesh jadhav

  लोकशाही तसेच भारतीय राज्यघटनेने ह्या देशाला केवळ स्वातंत्र्य समता आणि
  बंधुता ही मानवी मूल्य दिली नसून ह्या देशातील प्रत्येक नागरिकाला हजारो
  वर्षापासून चालत आलेल्या चातुर्वर्ण्यापासून मानुवादापासून सुद्धा मुक्ती मिळवून दिली.ह्याच लोकशाहीमुळे
  रक्तपात न होता मतदानाच्या प्रक्रियेतून लोकांनी त्यांना नको असलेलं सरकार पाडून
  सत्ता बदल घडवून आणला.एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला आणि मोदींनीच उल्लेख
  केल्या प्रमाणे नीच जातीतला सर्व सामान्य माणूस ह्या देशाचा पंतप्रधान होऊ शकला.हा
  बदल फक्त आणि फक्त लोकशाही राज्यव्यवस्था अमलात आणल्यामुळेच घडला आहे.अन्यथा मोदी
  सारख्या सामान्यांनी कितीही कर्तुत्व दाखवलं असतं तरीही इथल्या धर्म संस्थेने
  त्यांना सर्वोच्च पद बहाल केलं नसतं.आताही जितक्या सहजतेने त्यांनी हे पद हस्तगत
  केलंय तितक्या सहजतेने त्यांनी इथल्या एखाद्या शक्तीपिठाच शंकराचार्यापद मिळवून
  दाखवावच मग मनुवादी पिलावळ बघा किती गहजब करते ते.मानुवादाच्या जोखडातून
  ब्राम्ह्ण्यवादाच्या गुलामगिरीतून मानसिकदृष्ट्याही मुक्त होण्यासाठी लोकशाही
  सारखा मार्ग ह्या देशाने अंगीकारला.पण मोदी किंवा इतक्या सर्वोच्च पदावर
  पोहोचलेल्या किंवा पोहोचू पाहणार्या सामान्य व्यक्तीचं असं वर्तन म्हणजे मानुवादाच
  उदात्तीकरणच आहे.कोणी काहीही म्हणो.दलित मुस्लीम आणि इतर अल्पसंख्य समाज यांचा संघ
  प्रणीत सरकारला मुळात याचं साठी विरोध होता आणि कायमच राहील कारण हे उघड उघड
  धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थे द्वारे अशा धार्मिक प्रथेच आणि रीतीरिवाजाच पालन
  करतात.भारतीय राज्यघटनेने एका सामान्य कुटुंबातील नीच जातीतील व्यक्तीला सर्वोच्च
  पद बहाल केलं पण दुर्दैवाने त्याची मनुवादी मानसिकता मात्र काही बदलु शकली नाही.ह्या
  मानसिक गुलामगिरीतून जेंव्हा ह्या देशातील प्रत्येक नागरिक मुक्त होईल तेंव्हाच हा
  देश खऱ्या अर्थाने महासत्ता होईल अन्यथा असे कितीही तोतया विकासपुरुष आले तरीही
  ह्या देशाची काडीमात्र प्रगती होणार नाही.

close