भाजपमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग?

May 18, 2014 1:04 PM0 commentsViews: 5734

amit shah nd modi
18 मे :  निकालांची गडबड संपल्यावर आता भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत पक्षाच्या नेत्यांसोबत बैठकींचा धडाका लावला आहे. राजनाथ सिंह कॅबिनेटमध्ये मंत्री झाले तर भाजप अध्यक्ष कोण होणार, यावर भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शाह यांच्यासोबत मोदींची बैठकीत चर्चा झाल्याचं समजते.

तर दुसरीकडे राजनाथ सिंह यांना मंत्रीपद नको आहे, पण पक्षाने आग्रह केलाच तर ते गृह खात्यासाठी उत्सुक आहेत. या खात्यावर सुषमा स्वराज यांचाही डोळा आहे अशी सूत्रांची माहिती आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही आज मोदींची भेट घेतली.

दरम्यान, कॅबिनेट पदासाठी इच्छुक असलेले अनेक नेत्यांनी आरएसएसचे नेते सुरेश सोनी, दत्तात्रय होसबोळे आणि भय्याजी जोशी यांची भेट घेतली. त्यामुळे या मंत्रिमंडळावर आरएसएसचं वर्चस्व राहिल असं म्हंटलं जातंय. मात्र याचं भाजपच्या व्यंकय्या नायडूंनी खंडन केलंय. ते म्हणाले की मंत्रिमंडळाबाबत भाजपचं निर्णय घेईल. संघ यामध्ये कोणतीही ढवळाढवळ करणार नाही.

close