राजीनाम्याच्या निर्णयावर विचार करायला वेळ हवा – नितीश कुमार

May 18, 2014 7:26 PM0 commentsViews: 900
nitish-kumar1-384x28818 मे :बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आपला राजीनामा परत घेण्यावर नितीश कुमारांनी विचार करण्यासाठी एक दिवसाचा वेळ मागितला आहे. उद्या जेडीयूची पुन्हा बैठक हेणार आहे. विधीमंडळ नेता निवडण्यासाठी आज जेडीयूच्या आमदारांची पाटण्यात बैठक झाली. या बैठकीत शरद यादव आणि बिजेंद्र यादव यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.
दरम्यान, नितीश कुमार यांनी त्यांचे कट्टर विरोधक लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा केली. बिहारमधलं धर्मनिरपेक्ष सरकार गडगडू नये यासाठी लालू प्रसाद यादव हेही प्रयत्न करतील, अशी जेडीयूच्या नेत्यांना अपेक्षा आहे. पण, जेडीयू आणि आरजेडीमधल्या काही नेत्यांमध्ये एकत्र येण्यावर मतभेद आहेत. दुसरीकडे बिहार भाजपचे आमदार राज्यपालांना भेट घेतली आहे. राज्यात निवडणुका नको, असं बिहार भाजपचं म्हणणं आहे.लालूंच्या तीन आमदारांनी आज राजीनामा देऊन त्यांना चांगलाचं धक्का दिला आहे. पण, त्यांनी जेडीयूला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.
दरम्यान, जेडीयूचे नितीश कुमार आणि आरजेडी लालूप्रसाद यादव हे एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि काल संध्याकाळीच ते एकमेकांशी बेललेत अशी माहिती राष्ट्रीय जनता दलाच्या सुत्रांकडून मिळाली होती. मात्र रविवारी दुपारी लालूप्रसाद यादव यांनी हि माहिती फेटाळून लावली आहे. ‘मी जेडीयूच्या संपर्कात नाही, असा खुलासा राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी केलाय. तसंच शरद यादव यांच्याशी बोलणं झाल्याचं वृत्तही त्यांनी फेटाळलं.

नितीशकुमार यांच्या कारकिर्दीतले चढउतार

  • 1985 – पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक जिंकली
  • 1989 – लोकसभा निवडणुकीत विजय, व्ही.पी. सिंग सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री
  • 1990 – लालू प्रसाद यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यात मदत
  • 1994 – लालू प्रसाद यादव यांच्यापासून विभक्त होऊन समता पक्षाची स्थापना
  • 1998 – वाजपेयी सरकारमध्ये रेल्वेमंत्री
  • 2005 – बिहारमध्ये एनडीएला बहुमत, नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदी निवड
  • 2009 – लोकसभा निवडणुकीत 20 जागांवर विजय
  • 2010 – पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवड
  • 2013 – मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केल्यानंतर भाजपशी फारकत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close