आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री?

May 18, 2014 5:12 PM0 commentsViews: 3042

anandiben patel18 मे : गुजरातच्या विद्यमान महसूल मंत्री आनंदीबेन पटेल याच गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री होणार, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. येत्या काही दिवसातच गुजरातच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल, असंही सूत्रांकडून कळतं. पटेल या मोदींच्या विश्वासू समजल्या जातात.

लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मताधिक्य मिळाल्याने नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे गुजरातमधील मोदींचा उत्तराधिकारी कोण यावर गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे.

close