इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावास बंद

April 10, 2009 11:25 AM0 commentsViews: 3

10 एप्रिल तालिबानींच्या वाढत्या दबावामुळे सुरक्षेच्या कारणावरून, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील दूतावास अमेरिकने बंद केलं आहे. तसंच इस्लामाबादला हाय अलर्टचा इशारा दिला आहे. वाढत्या सुरक्षाव्यवस्थेमुळे हा निर्णय घेतला असल्याचं पाकिस्तानमधल्या अधिकृत सूत्रांचं म्हणणं आहे. पण इतर देशांनीही पाकिस्तानमधले त्यांचे दुतावास बंद केले आहेत. तेव्हा अमेरिकनेही करावं, असा दबाव तालिबानींनी अमेरिकेवर घातला आहे. पाकमधल्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थानीही आपली ऑफिसेस बंद केली आहेत. तालिबानी अतिरेकी इस्लामाबादवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे रिपोर्ट वारंवार मिळत आहेत. त्यात पाकची अंतर्गत स्थिती ढासळत आहे. तसंच अमेरिकेने तालिबान्यांवर केलेल्या ड्रोन (बंकर मिसाईल हल्ला) हल्ल्यांमुळेही अमेरिकी दुतावासाला धोका होता. त्यामुळेच हा दुतावास बंद करण्यात आल्याचं कारण सूत्रांनी दिलं आहे.

close