नितीश कुमार राजीनामा मागे घेणार का?

May 19, 2014 9:37 AM0 commentsViews: 412

NITISH_KUMAR_1491981f19  मे : जेडीयूच्या आमदारांच्या आग्रहानंतरही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागे घेण्यास नकार दिला आहे. पण आमदारांचा रोख पाहता नितीश कुमार यांनी निर्णयावर विचार करायला एक दिवसाचा वेळ मागून घेतला आहे. पक्षाच्या खराब कामगिरीसाठी पक्षाध्यक्ष शरद यादवच जबाबदार आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही जेडीयूच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत करण्यात आली. नितीशकुमार यांच्या समर्थकांनी त्यांच्या राजीनामा निषेधार्थ पाटण्यामध्ये निदर्शनं करत पक्षाध्यक्ष शरद यादव यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.

दरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली राजेडीच्या तीन आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन लालूप्रसाद यादव यांना चांगलाचं धक्का दिला आहे. जेडीयूमध्ये लालू प्रसाद यादव यांचा आरजेडी आणि काँग्रेसबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडी करण्यावरही गांभीर्याने विचार सुरू केलं आहे. पण, जेडीयूमधल्याच काही आमदारांचा त्याला विरोध आहे. आज जेडीयूची पुन्हा बैठक होणार आहे.

नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं ही सांगण्यात येत आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यायला हवं असं मत लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केलं. मात्र रामविलास पासवानांनी त्यावर टीका केलीये.’आतापर्यंत एकमेकांविरूद्ध लढलेले आता एकत्र येत आहेत. हा केवळ निवडणुका टाळण्यासाठीचा आटापिटा असल्याचं’ राम विलास पासवानांनी म्हटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close