बँकांनी केली क्रेडिट कार्डावर क्रेडिटची मर्यादा कमी

April 10, 2009 2:27 PM0 commentsViews: 1

10 एप्रिल गरजेच्या वेळी आपल्या सर्वांनाच आठवण होते ती क्रेडिट कार्डची. क्रेडिट कार्ड आहे म्हणून आपल्यापैकी अनेकजण नि:श्चिंत होऊन बाहेर पडतात. पण आता बँकांनी क्रेडिट कार्डवर क्रेडिटची मर्यादा कमी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना क्रेडिट कार्डवर जास्त अवलंबून राहता येणार नाही. सर्वसाधारणपणे ग्राहक क्रेडिट कार्डवर पन्नास टक्के रक्कमच काढू शकतो. पण अनेक बँकांनी क्रेडिट कार्डवरची क्रेडिटची मर्यादा कमी केलीये तर काही बँकांनी ही मर्यादाच काढून टाकलीये. आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेनं ही मर्यादा दहा टक्क्यांनी कमी केलीये. म्हणजे ग्राहक आता पन्नास हजार रुपयांवर फक्त पाच हजार रुपयेच काढू शकतील. बार्केले आणि डॉईश बँकेनं क्रेडिट लिमिट काढूनच टाकलंय. मंदीच्या काळात ग्राहकांच्या रिस्क प्रोफाईलची समिक्षा करुनच कॅश आणि क्रेडिटची मर्यादा कमी केल्याचं बँकांनी स्पष्ट केलंय.

close