पाकिस्ताननं दिलं नरेंद्र मोदींना आमंत्रण

May 19, 2014 4:33 PM0 commentsViews: 2786

pak_on_modi19 मे : भाजपचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दैदिप्यमान यशामुळे शेजारील राष्ट्रांचे डोळे पांढरे झाले आहे. पाकिस्तानने आता नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी फोन करुन नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं होतं.

भाजपच्या या दणदणीत विजयानंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा शरीफ यांनी व्यक्त केली आहे आणि पाकिस्तानला येण्याचं नरेंद्र मोदींना आमंत्रण दिल्याचं, पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी म्हटलं आहे. तर त्याअगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं होतं.

तसंच मोदींना चाय पे चर्चेसाठी आमंत्रणही दिलंय. विशेष म्हणजे गुजरात दंगली प्रकरणी अमेरिकेनं मोदींना व्हिसा नाकारला होता आता मोदी देशाचे पंतप्रधान होणार असल्यामुळे अमेरिकेनं पायघड्या घालण्यास सुरुवात केलीय. आता नरेंद्र मोदी पाकिस्तानचं निमंत्रण स्वीकारणार का ? पाक भेटीला जाणार का ? याबद्दल उत्सुक्ता वाढली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close