टीम मोदींमध्ये राजनाथ सिंह नसणार ?

May 19, 2014 5:16 PM0 commentsViews: 5184

narendra modi rajnath_news

19 मे : लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर आता मोदी सरकार मंत्रिमंडळाच्या तयारीला लागली आहे. खातेवाटपावर चर्चेसाठी भाजप आणि संघ नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. राजनाथ सिंह काही काळ पक्षाध्यक्षपदी कायम राहणार अशी शक्यता आहे.

त्यांचा लगेच मंत्रिमंडळात समावेश नाही अशी सूत्रांची माहिती आहे. राजनाथ यांना गृहमंत्रालय दिलं तर अंतर्गत सुरक्षा खातं वेगळं करून ते खातं मोदी स्वतःकडे ठेवणार असंही सांगण्यात येतंय. सुषमा स्वराज यांना मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्याची शक्यता आहे तर अरुण शौरींकडे अर्थखातं देण्यासाठी मोदी प्रयत्नशील आहेत. अरुण जेटलींना परराष्ट्र खातं मिळण्याची शक्यता आहे.

करिया मुंडांना लोकसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालय मुरली मनोहर जोशींकडे दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 24 तारखेला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मोदींसोबत चार 4 वरिष्ठ मंत्री शपथ घेतील असं कळतंय.

ठळक मुद्दे

- राजनाथ सिंह पक्षाध्यक्षपदी कायम
- राजनाथ यांना गृहमंत्रालय दिलं तर अंतर्गत सुरक्षा खातं वेगळं करून मोदी स्वतःकडे ठेवणार
- सुषमा स्वराज यांना मनुष्यबळ विकास मंत्रालय
- अरुण शौरींकडे अर्थखातं देण्यासाठी मोदी प्रयत्नशील
- अरुण जेटलींना परराष्ट्र खातं ?
- करिया मुंडांना लोकसभा अध्यक्षपद ?
- संरक्षण मंत्रालय मुरली मनोहर जोशींकडे ?
- 24 तारखेला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ?
- मोदींसोबत चार 4 वरिष्ठ मंत्री घेणार शपथ – सूत्र
 
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close