ऐश्वर्या म्हणाली,’वेलकम पीएम’ !

May 19, 2014 7:59 PM0 commentsViews: 5144

19 मे : भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या एकहाती विजयावर चोहीकडून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. मोदींच्या या विजयांचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर माजी विश्वसुंदरी, अभिनेत्री आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन हीनेही ‘वेलकम पीएम’ असं म्हणून नरेंद्र मोदींच्या विजयाबद्दल अभिनंदन केलंय. जो काही निकाल लागला तो आपण सगळ्यांनी पाहिला आहे. मोदींचा विजय झालाय तो कौतुकास्पद आहे. आता त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे असंही ऐश्वर्या म्हणाली. ऐश्वर्या राय बच्चन सध्या कान फिल्म फेस्टिवलसाठी आलीय. त्यावेळी आमचे करस्पाँडंट सुशांत मेहता यांनी तिच्याशी बातचीत केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close