दलित कार्ड, जीतन राम मांझी बिहारचे नवे मुख्यमंत्री !

May 19, 2014 11:15 PM0 commentsViews: 1179

90jitan ram manjhi bihar19 मे : लोकसभेत दारुण पराभवामुळे बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदी जीतन राम मांझी यांनी निवड करण्यात आलीय. बिहराच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीशकुमारांनी दलित चेहरा निवडलाय. ही त्यांची हुकुमी राजकीय खेळी असल्याची चर्चा आता सुरू झालीय.

नितीश कुमारांनी राज्यातल्या दारूण पराभवानंतर दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मागे घेणार नाही असं स्पष्ट केलं. आज (सोमवारी) सकाळी संयुक्त जनता दलाच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. त्यात बिहारचे नवे मुख्यमंत्री ठरवण्याचा सर्वाधिकार पक्षाने नितीशकुमार यांना दिले. त्यापूर्वीच नितीश कुमार यांचा राजीनामा देण्याचा निर्णय अगदी योग्य आहे, आणि तो देशाच्या तसंच पक्षाच्या हिताचा आहे असं पक्षाध्यक्ष शरद यादव यांनी स्पष्ट केलं होतं.

कोण आहेत मांझी?

  • - जीतन राम मांझी हे नितीश कुमार यांचे विश्वासू सहकारी
  • - मगध विभागातल्या गयामधून निवडून आले आहेत
  • - मुसहर या महादलित समाजातले
  • - नितीश कुमार सरकारमध्ये SC/ST कल्याण मंत्री होते
  • - लोकसभेची ही निवडणूक लढवली, हरले
  • - प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहणं पसंत करतात

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close