नरेंद्र मोदींची संसदीय पक्षनेतेपदी निवड

May 20, 2014 12:14 PM0 commentsViews: 1722

modiparliament2_47520  मे : भाजपच्या संसदीय समितीच्या नेतेपदी आज नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता अधिकृतरित्या मोदी देशाचे पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला भाजपच्या अनेक नेत्यांनी अनुमोदन दिलं.

अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, मुरली मनोहर जोशी, रविशंकर प्रसाद, व्यंकय्या नायडू आणि इतर नेत्यांनी मोदींच्या नावाच्या प्रस्तवाला अनुमोदन दिलं. यानंतर भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालं अशी घोषणा केली.

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणन सक्षम आहेत असं सांगत राजनाथ म्हणाले की यांनी हैद्राबदमधल्या रॉली मध्ये येस वी विल असं म्हटलं होतं, त्यांचं नार्‍याला पुढे करत ‘येस ही विल’ अशी घोषणा केली. हे म्हणून त्यांनी बराक ओबानांच्या प्रचाराचं घोष वाक्य येस वी कॅनची अठवण करून दिली. या घोषणेनंतर मोदींचं अभिनंदन करताना लालकृष्ण अडवाणी भावूक झाले. मी आज जेव्हा मोदींना भेटलो, तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आलं, असं अडवाणी म्हणाले. यानंतर, जेव्हा नरेंद्र मोदींनी बोलायला सुरूवात केली, तेव्हा ते पण अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणीनी भावूक झाले. आज जर वाजपेयी इथं असतं, तर सोन्याहून पिवळं झालं असतं, असं मोदी म्हणाले.

भाजपचा आजचा नियोजित कार्यक्रम काय आहे त्यावर एक नजर टाकूया…

  • संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 11.30 पर्यंत जमण्याचे भाजप खासदारांना आदेश
  • नरेंद्र मोदी 11.50 पर्यंत संसदेत येणार – दुपारी 12 वाजता
  • भाजप नेते मोदींना संसदीय पक्षाचे नेते म्हणून औपचारिकरीत्या निवडणार
  • दुपारी एक वाजता एनडीएचे मित्रपक्ष भोजन समारंभात भेटणार
  • दुपारी अडीचच्या सुमारास एनडीएचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार
  • दुपारी चारच्या सुमारास मोदी अहमदाबादला परत जाणार
  • संध्याकाळी गुजरातच्या मणिनगरमध्ये मोदींचा कार्यक्रम

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close