राज्यात पाण्याचा तुटवडा

May 20, 2014 11:29 AM0 commentsViews: 190

20  मे : मे महिन्याच्या शेवटी पावसाळ्याचं वातावरण निर्माण झालं असलं तरी राज्यातल्या अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा पाणी टंचाई भीषण नसली तरी अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबादमध्ये 130 टँकर्सनं पाणीपुरवठा होत आहे. कोकणात यंदा पाणीटंचाई जाणवते. नागरिकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत आहे. अनेक भागातील हातपंपांचं पाणी आटल्यानं पाणी मिळणं अवघड झालं आहे. प्रशासनाच्यावतीनं तर उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्याचे 49 टँकर आणि बीडमध्ये जवळपास 93 टँकर्सनं पाणीपुरवठा सुरू केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close