सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पर्याय

May 20, 2014 11:12 AM25 commentsViews: 2452

Vishambar chaudhariविश्वंभर चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सामाजिक बांधिलकीतून समाजाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना खूप काही शिकवले आहे. एकप्रकारे ज्या जनतेसाठी सामाजिक कार्यकर्ते काम करतात त्या जनतेनेच त्यांच्याशी प्रतारणा केल्याचे दिसत आहे, हे दु:खद आहे.

मेधाताई पाटकर यांच्यापासून बाळासाहेब दराडे यांच्यापर्यंत (राजू शेट्टी यांचा अपवाद वगळता) महाराष्ट्रातील जवळपास सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा मोदी लाटेत पराभव झाला. वामनराव चटप, मारुती भापकर, विजय पांढरे, सदाभाऊ खोत ही माणसे गेली अनेक वर्षे भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. आपली नोकरी पणाला लावून विजय पांढरे यांनी जलसंपदा विभागातील घोटाळे बाहेर काढले. विजय पांढरे यांचा अपवाद वगळता (कारण ते आतापर्यंत शासकीय सेवेत होते) बाकीची माणसे गेली किमान तीस वर्षे लोकांसाठी रस्त्यावरच्या लढाया लढत आहेत. काहीच वैयक्तिक स्वार्थ न ठेवता केवळ लोकांसाठी पोलिसांच्या काठ्या खायच्या, अगदी दिवाळीचा सणसुद्धा जेलमध्ये काढायचा, अनेक गुन्हे नोंदवले जाऊन प्रत्येक ठिकाणी केवळ आणि केवळ छळ सोसून, स्वत:च्या आयुष्यात काळोखाला तोंड देत, लोकांच्या घरी दिवा लागावा म्हणून आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं हे सोपं नक्कीच नाही. आणि त्यांच्या त्यागाचा, समर्पणाचा समाज असा उतराई होत असेल तर या वाटेवर चालू इच्छिणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी बरंच काही शिकण्यासारखं आहे. एक स्पष्ट केलं पाहिजे की हे मी नैराश्यातून म्हणत नाही, व्यावहारिक विचारातून म्हणतो आहे किंवा नव्याने सामाजिक-राजकीय काम करू इच्छिणाऱ्या तरुण मित्रांसाठी हे म्हणतो आहे. २०१४ चा जनादेश काय सांगतो आपल्याला?

१. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अण्णा, मेधाताई, अरविंद आंदोलन करतात तो मुद्दा लोक निवडणुकीत महत्त्वाचा मानत नाहीत. “भ्रष्ट असला तरी चालेल, कार्यक्षम हवा किंवा खरं म्हणजे प्रचार तंत्रात उत्तम हवा” अशी लोकांची धारणा आहे. लोकांनी भ्रष्टाचार हा महत्त्वाचा मुद्दा मानला असता तर अशोक चव्हाण, येडियुरप्पा यांच्यापासून भ्रष्टाचार विषयात ज्यांची देशभर चर्चा झाली असे अनेक जण निवडून आलेच नसते. उदा.

अ) एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने एकाच सराफाकडून एकाच दिवशी ५० लाखांचे दागिने घेतले आणि नंतर पोलिसांनी ते प्रकरण यशस्वीरीत्या दडपले, माध्यमांनी हा विषय दोन-तीन दिवस दाखवला, तेच पोलीस अधिकारी प्रचंड मतांनी निवडून आले.

ब) अमेरिकेच्या नासातील उत्तम करिअर ध्येयवाद म्हणून सोडून देऊन बुलडाण्यात उभे राहिलेले बाळासाहेब दराडे यांना ३०,००० मते मिळतात. याउलट याच जिल्ह्यातील १,४५,००० कुटुंबांना बॅंक घोटाळ्यातून चुना लावण्याचा आरोप असलेले, सहकारी साखर कारखाना घोटाळ्यात आरोप झालेले शिवसेनेचे प्रतापराव जाधव दीड लाख मतानी निवडून येतात.

क) गेली तीस वर्षे अण्णा आणि ताईंच्या आंदोलनांमध्ये रक्ताचे पाणी करणारे, झोपडीतील लोकांना घर मिळत नाही म्हणून व्रतस्थपणे आठ वर्षे अनवाणी चालणारे मारुती भापकर; त्यांना लोक केवळ तीस हजार मते देतात आणि अण्णांच्या केवळ व्यासपीठावर हजेरी लावणारे जनरल व्ही.के. सिंग देशात नंबर दोनची मत-आघाडी घेऊन निवडून येतात. अशी अनेक उदाहरणे देशभर देता येतील. वर असे उल्लेख करणाऱ्याला “तुम्ही जनमताचा आदर केला पाहिजे” असेही सुनावले जाईल!

3dd0076545a7272fd597c2156d5c6352

२. “चांगल्या लोकांनी राजकारणात यावे” असा धोशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागे अनेक लोक अन्य वेळी लावत असतात. “तुम्ही काठावर राहून बोलता, प्रत्यक्ष लढाईत का उतरत नाही, लोकांना पर्याय हवा आहे” असे म्हणणारे उत्साहीवीर प्रत्यक्षात आणि सोशल मीडियावर खूप असतात, प्रत्यक्ष चांगली माणसे उभी राहिली की हे लोक मदत तर करतच नाहीत, उलट विरोधात मत देतात आणि नंतर “शक्ती नव्हती तुमच्यात तर का उभे राहिलात?” असा उलट प्रश्न विचारतात! त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘चांगल्या लोकांनी राजकारणात यावे’च्या सापळ्यात अजिबात अडकू नये. आम्ही सोबत राहू म्हणणारे कधीच साथ देत नाहीत. मी फेसबुकवर बाळासाहेब दराडे यांच्यासाठी निधी देण्याचे आवाहन केले होते, लोकांनी जी रक्कम दिली ती इतकी छोटी आहे की इथे ती सांगण्याची देखील लाज वाटते. संसदेत जायला योगेंद्र यादव यांच्यापेक्षा अधिक ‘चांगला’ माणूस मिळाला असता? त्यांना लोकांनी पाडले. सशक्त पक्षातला भ्रष्ट, अडाणी, गुंड असा उमेदवार लोकांना अशक्त पक्षातील स्वच्छ, सुशिक्षित, सुसंस्कृत उमेदवारापेक्षा जास्त आवडतो! मतदारांची ही मानसिकता असेल तर पर्यायी राजकारण वगैरे कधीच उभे राहू शकत नाही.

३. भ्रष्टाचार हा मुद्दा घेऊन अण्णांनी २०११ मध्ये आंदोलन केले तेव्हा सगळा देश रस्त्यावर आला! प्रत्यक्षात त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा मुद्दाच लोकांसमोर नव्हता! अडीच वर्षात देशात असा कोणता भ्रष्टाचार कमी झाला म्हणून लोकांना तो निवडणुकीत Non-issue वाटावा? काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सगळे भ्रष्ट पाडून सेना-भाजपमधील सर्व भ्रष्ट निवडून आणणे यालाच जनतेचा भ्रष्टाचार विरोध म्हणायचे का? ‘वर’ मोदी यावेत यासाठी ‘खाली’ त्यांच्या पक्षाचा उमेदवार कितीही भ्रष्ट असला तरी आम्ही त्याला मत देऊ अशी मतदाराची मानसिकता आहे. काँग्रेस भ्रष्ट मार्ग वापरत असेल तर तुम्हीही भ्रष्ट मार्ग वापरण्यात कचरू नका असा मतदाराचा कल आहे. सामाजिक कार्यकर्ते तशी रसद जोडू शकत नाहीत. ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची असेल त्याने कॉर्पोरेट क्षेत्राची मदत सोबत असेल तरच निवडणुकीत उतरावे, अन्यथा नाही. सगळी सोंगे आणता येतील पण पैशाचे सोंग आणता येत नाही. एक त्यातल्या त्यात बरे आहे की तुम्ही प्रचाराला पैसा कोणत्या मार्गाने आणला यात मतदारांना स्वारस्य नाही, त्यामुळे तुमच्यावर टीका होण्याची शक्यता नाही. वाटेल तर दाऊदकडून पैसे आणा पण निवडून येऊन ‘रिझल्ट’ दाखवा असा मतदारांचा कौल आहे. हे कॉर्पोरेट जगताच्या मानसिकतेशी सुसंगत आहे. अमुक एक टार्गेट पूर्ण करा, त्यासाठी तुम्हाला काय करायचे ते करा हा कॉर्पोरेट संदेश आता निवडणुकीला लागू आहे. तेव्हा Results are important, not the means and principles.  

४. भ्रष्टाचारी नेत्यांना पर्याय द्या म्हणजे मग बदल घडेल ही मांडणी पूर्णत: चूक आहे. देशात जागोजाग चांगले लोक आपापल्या परीने पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरा प्रश्न पर्याय नसण्याचा आहे की पर्यायांना मत देण्याची लोकांची मानसिकता नसण्याचा आहे? म्हणून चांगल्या लोकांनी ‘पर्याय द्या’च्या मोहक सापळ्यात अडकू नये.

27sld4

५. भ्रष्टाचार हा मुद्दा ४ वर्षे ११ महिने २९ दिवस लोकांना महत्त्वाचा वाटतो आणि मतदानाच्या दिवशी त्यांच्या इतक्या निरनिराळ्या अस्मिता जाग्या होतात की ते हा मुद्दा विसरून मतदान करतात. उमेदवाराची जात, धर्म, पक्ष, श्रीमंती, निवडून आल्यास कोणासोबत जाणार  इत्यादी घटक त्या दिवशी सर्वात महत्त्वाचे ठरतात. निवडणुकीत सामाजिक कार्यकर्त्यांची खिल्ली उडवणारे लोक निवडणुका संपताच त्यांच्या प्रश्नांवर लढायला मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनाच आग्रह करतात! निवडून आलेले राजकारणी मग पुन्हा पुढची ४ वर्षे ११ महिने २९ दिवस त्यांच्यासाठी निर्भर्त्सनेचा विषय असतात आणि त्यांचे प्रश्न घेऊन कर्तव्यबुद्धीने सामाजिक कार्यकर्त्यांनाच रस्त्यावर उतरावे लागते. सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांसाठी राजकीय व्यवस्थेशी शत्रुत्व घ्यायचे आणि लोकांनी मात्र निवडणुकीत त्यांचेच मित्र बनून आपल्याला शिव्या घालायच्या हा सिलसिला किती दिवस चालणार? आपल्या सर्व सुखाचा त्याग करून, कुटुंबावर अन्याय करून आपण हे सर्व कोणासाठी करत आहोत? कशासाठी करत आहोत? एकच एक राजकीय नायक आपले सर्व प्रश्न सोडवू शकतो असा दुर्दम्य विश्वास लोकांमध्ये असेल तर आपल्या सामाजिक कार्याचे प्रयोजनच काय? आपण खरोखरच समाजाची गरज वगैरे आहोत का? निवडणूक प्रचारात Good governance, development, change असे हुकमी एक्के चालवले की लोक भ्रष्टाचाराचा मुद्दा लोक विसरतात हे राजकीय पक्षांना चांगलेच कळले आहे. अन्यथा (डावे वगळता) सर्वच राजकीय पक्षांना लोकांनी हा प्रश्न जरूर विचारला असता की “लोकपालच्या कक्षेत तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्र का नको आहे? तुम्ही त्यांच्यावर एवढे का मेहेरबान आहात?” पण या मुद्द्याची कुठे चर्चासुद्धा झाली नाही.

६. प्रबळ राजकीय पक्षातील चांगले लोकही प्रसंगी पराभूत होतात, मात्र पुन्हा उभे राहण्याचे आर्थिक बळ त्यांना त्यांचा पक्ष पुरवत असतो. आपण आपली आयुष्याची कमाई समाजासाठी पणाला लावून जास्तीत जास्त एकच निवडणूक लढवू शकतो. एकच निवडणूक लढण्याचे आर्थिक बळ जोडताना नाकीनऊ येतात तिथे दुसरी निवडणूक लढण्याचा विचार करणे पण शक्य नसते. 

मला माहीत आहे की, या लेखावरसुद्धा ‘निराशेचे बोल’ वगैरे शेरेबाजी होईलच. पुन्हा अमुक एक निवडून आले आणि हे विचाराने तमुक एक असल्याने यांच्या पोटात दुखते आहे अशी ठोकळेबाज प्रतिक्रिया देखील येईल. पण तरीही मला हे बोललेच पाहिजे. माऊसच्या, ‘लाईक’च्या एका क्लिकचे धनी असलेले टीकाकार काय म्हणतात यापेक्षा मला सामाजिक कार्यातील ते तरुण महत्त्वाचे वाटतात, जे एक ध्येयवाद घेऊन देशात मतपेटीतून बदल घडवण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांना मी DISCOURAGE करत असल्याचा आरोप माझ्यावर झाला तरी चालेल, समाजाचे वास्तव त्यांच्यासमोर मांडणे हे मी माझे कर्तव्य मानतो. कारण देशभरातील अशा सर्व तरुणांना मी माझे भाऊच मानतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • abhay tarange

  They all paid for Kejariwal’s mistake .

 • abhay tarange

  There was a great deal of respect for all these people but public found them directionless. Medha Patkar openly supports slum dwellers and illegal occupants , why should taxpayers share her views. Raju Shetty too joined the winning league about time , yeah it is pity that Sadabhau couldnt win. Others have a lot of things to learn. Joining AAP was mistake for many of these good fellas. But they can keep doing good work. In or out of politics they can always reach needy people.

 • Akshay Jadhav

  raajlaran ani samajkaran yaat kup farak asato…..tyach kaam tyanech karav. ….

 • Amit

  Joining Arvind Kejriwal (AAP) was the biggest mistake for shortlisted Good People. He made terrible decisions one after another. And i also think that when voting for LS Elections every voter must think on National Level. Because “LAKH MELE TARI CHALTIL PAN LAKHANCHA POSHINDA JAGLA PAHIJE”. Modi na PM banavnyasaathi 10-12 nalayakana nivdun dile yat kunala regret vatnyache ajibat karan nahi.

  Moreover, AAP could not handle the state of Delhi then how people would have trusted them. I guarantee that even I could have managed the AAP better than Arvind.

 • Nachiket

  Excellent article! I agree that this time majority of the voting is for party-symbol than for a candidate. All this is to get Mr. Modi as prime-minister. But I would like humbly disagree with your thoughts on few issues:
  1. Social workers have to accept the fact that our society as whole is bunch of corrupt minds. By corruption I don’t mean just bribing, but I am talking about over all social/public mannerism. People support nepotism/favoritism, people violate traffic rules, people disobey queues.
  2. A leader has to come up with some solution to this situation. And good governance is one of the key solutions. Not that it will change mentality of society, but it will reduce avenues for corruption.
  3. Implementing such a system is extremely difficult. Mr. Narendra Modi has good track record for implementing such system. I am not saying Gujarat is free of all malpractices, but atleast it is better than many other states in terms of governance and hence people elected him.
  4. People elected AAP in New Delhi. What they did with that ? Is Lokpal really a solution to all possible problems ? Also they restricted their promise to reduce electricity bill only for those who supported them during their Aandolan. Is this a way a government should take decisions ?
  5. A leader shouldn’t crib about situation, he should provide solutions to social problems. Aandolan and all are means to highlight the problem that government is glossing over, but solving problem requires some experience. Hence if I may, I would like to suggest, to all prospective social workers to contend local elections before jumping in for Loksabha elections. Take some experience of decision making and problem solving and then proceed ahead.

  I have immense respect for all the names that you mention in your article, and had respect even for AAP leaders till they left Delhi government. So please do not feel that I am trying to preach something by sitting in an arm-chair.

 • Book Worm

  सदाभाऊ खोत- निस्वार्थ कार्यकर्ता… गुड जोक

 • सुखदेव पाटील

  भ्रष्टाचाराचा मुद्दा लोकांनी दुर्लक्षित केला नाही …..आणि सर्वच पार्टीनी हा मुद्दा उचलून धरला होता …..तदनंतर लोकांना एक स्थिर सरकार हवे आहे . त्यासाठी एकाच पक्षाच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक होते .. तो पण असा पक्ष की ज्याला केंद्रिय सरकार चालवल्याचा अनुभव आहे .

 • http://www.vishwajeetv.com vishwajeetv

  Unfortunately, the ‘alternatives’ being suggested is full of bad governance and anarchy. Seriously, after that 49-days blunder in Delhi by AAP, would any sane citizen likely to vote AAP?

  Although, many of these were very good candidates, but they lost because they DO NOT KNOW HOW TO PLAY THE GAME! We’re not living in the ideal, perfect world where an election truly represents what and whom people want, the one who is the most powerful (or seems to be so), wins! And Power can be bought with money which businesses, capitalists lend them. And the favour has to be returned with favours. This is the way the game works, WHY DON’T THEY (social workers) ACCEPT THIS FACT? Play the game if you know how to play it.

  The blog cites for an example about Mr. Darade who left his NASA job to fight the election. Patriotism ? Swades? NO. It’s stupidity.

  And yes, the player doesn’t have to be ‘bad’! Winners of such game can strategically keep playing it for 5 years to bring positive change. I believe that Mr. Modi would do the same.

  And yes, Results are important, not the means and principles!

 • Sharad B. Darade

  I Hope

 • pravin

  Good article! 35% criminals won the election…worst of the Kaliyug is yet to come!

 • Pravin Dhome

  मला तुमचा मुद्दा संपूर्ण पटत नाही. कारण लोकांनी अपच्या उमेदवारांना पडले त्यामागे दिल्लीतील अनुभव होता. तसेच हि निवडणूक देशातील होती. तुम्ही म्हणाल्या प्रमाणे जर लोकांनी मोदींना म्हणून मते दिली असतील तर ती बरोबर आहे. पण जर तस काही झाला नसता तर तुम्ही लगेच मोदींना टार्गेट करायला तयार झाले आस्ते कि नरेंद्र मोदींचा नेतृत्व लोकांनी नाकारलं वगैरे. तेंवा तुम्ही आशी हाळ हाळ

  व्यक्त केली नसती. आणि राजू शेट्टी यांना लोकांनी निवदालाच ना, तर तुमचा हा दावा हि फोल ठरतो कि सामाजिक कार्यकर्त्यांना लोकांनी पसंती दिली नाही. तसेच सगळीकडे मजबूत सरकारसाठी बोलत होते तर लोकांनी तसं केल तर तुम्ही तसं बोलू शकत नाही. आणि किरण बेदी सारख्यांनी सुद्धा नरेंद्र मोदींना पाठींबा दिला होता. तर अस समजू नका. देळीत केजारीवालाला लोकांनी निवडून दिलंच होत. तुमच्या सगळ्या तारकांचा विचार करून. त्यामुळे लोकांनी काही चूक केली अस वाटण्याचं कारण नाही. तसेच भ्रष्टाचार विरोधी आंदोलना वेळी हेच सामान्य लोक तुमच्या पाठीशी होते. आणि माझ्या माहितीनुसार तुम्हीतर केजारीवालानच राजकारणात जाण्यासाठी विरोध केला होतात. बरेच पक्ष हे सामाजिक चळवळीतूनच वर आलेले आहेत. तुम्ही असा विचार का करत नाही लोकांना वाटत असेल कि ह्या लोकांनी राजकारणात येवू नये ते ज्या कामात उत्तम आहेत तेच करावे.

  • geniusrohit

   BJP was not contesting there.

   • Pravin Dhome

    like u can speak from both side. many time people like say’s that watch the candidate not party…and now..these are double standards

 • pravin

  satte tun paisa milavta yeto (Cong), paisha tun satta milavta yete (BJP)

 • Saurabh Karnik

  रिझल्ट ओरिएन्टेड काम ही आजच्या काळातील तरुणांची मुख्य मागणे आहे.
  मेधाताईंविषयी आमच्या मनात प्रचंड आदर आहे पण त्यांना आम्ही नेता म्हणून निवडून देऊ
  शकत नाही. याच साधं कारण म्हणजे ‘भूतकाळातील कामाचा रिझल्ट काय?’ मुळात कन्वेन्शनल
  अर्थाने सामाजिक कार्य ही आपल्याकडील एक खुळचट आणि कालबाह्य कल्पना आहे. सामाजिक
  कार्यकर्त्याने गरिबीतच दिवस काढले पाहिजेत, त्यागच केला पाहिजे हे का मान्यकरायचं?
  बील गेट्स, नारायणमूर्ती आणि अशा कित्येकांनी सामाजिक कार्यात अधिक चांगले रिझल्ट्स
  दिले आहेत. अशा कार्यकर्त्यांना आम्ही नेता म्हणून नक्केच स्वीकारू पण केवळ त्याग
  केला आहे, प्रयत्न प्रामाणिक होते पण रिझल्ट शून्य, अशा वेळी आदर नक्केच मिळेल पण
  नेतृत्व पण स्वीकारार्ह असेलच असं नाही.

  माझी ही विचारसरणी टोकाची उजवी म्हणून गणली जाईल, कदाचित तात्त्विक पातळीवर
  कॉर्पोरेट विचारसरणी म्हणून माझी खिल्ली उडवली जाईल, पण व्यावहारिक पातळीवर,विशेषतः
  निवडून यायचे असेल तर ही मानसिकता स्वीकरण्याला पर्याय नाही!

  • vaibhav sarpotdar

   Perfect Saurabh. Mastach bolalaas. Me hi corporate khetraat kaam karato. Mala hi asach watata ki corporate khetra samajeek kaarya faar changalya paddhaatine karu shakata. Americyet Bill Gets ne mothya pramana var donations dyayacha trend aanala. Aapaya kade aapalya corporate house ne ajun suruwaat keli nahi pan ti nakki hoeel. Paisa lagtoch. 70000 khedi aahet aapalya kade.prachand kaam pratyek khetraat karava lagnaar aahe. Saksharte pasun bal mrutyu peryant aani bhrastachara pasun te good governance peryant. Hya madhye corporate khetracha paisa yet asel ter swagatach karayala pahije.navin asaprushyata nako.

 • Sandesh

  Khupach changla lekh ahe. Aplya Lokashahi cha kinwa system cha problem hach ahe ki Neta chukla tar tyala apan Shivya deu shakato pan Samaj nirnay ghenya sathi chukala tar tyala kon bolanar?

 • Parimala


  ​​A
  ​ political leader should have a political​
  ​ image.

  Non-political image and approach will not help run the governance! Rather it can ruin the country further!

  Hence, though the AAP candidates had good​
  ​ intentions..people did not elect them.​

 • umesh jadhav

  खरं तर सामाजिक संघटना समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांची काय ताकद
  असते हे फक्त राजकारणी लोकंच चांगलं ओळखतात.ह्या देशातील सत्ता बदलाचा आणि
  काँग्रेस सारख्या इतिहास आणि परंपरा लाभलेल्या पक्षाचं पानिपत करण्याचा पाया रचण्याची
  सुरुवात जनआंदोलनानेच झाली होती.पण त्याचा राजकीय फायदा राजकीय क्षेत्रात कोणताच
  पाया नसलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां ऐवजी भाजप सारख्या दुसऱ्या राजकीय पक्षाला झाला.त्यामुळे
  चौधरींसारख्या सच्च्या आणि हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्याच मन खट्टू होणं
  स्वाभाविकच आहे.पण याची सकारात्मक बाजू म्हणजे सामाजिक संघटनांच महत्त्व यातून
  अधोरेखित होतं.तसेच चांगली माणसं निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात उतरलीच की
  राजकारणात उतरणं म्हणजे निवडून येवून थेट सत्ता स्थापन करणे असा मुळीच होत
  नाही.काँग्रेस निवडणुकीत हरली म्हणजे ते राजकारणातून हद्दपार झाले असं म्हणता येईल
  का? भ्रष्टाचाराचा मुद्दा हा
  कितीही महत्वाचा असला तरी तो इतर महत्वाच्या मुद्यांपैकी एक होता आणि
  निवडणुकांमध्ये मतदार हा कधीच एका मुद्यावर मतदान करत नाही तर बेरोजगारी,रस्ते
  पाणी वीज कायदा सुव्यवस्था वगैरे मुद्दे,समस्याही विचारात घेतो.पण आंदोलनं
  करण्यासाठी कोणताही एक मुद्दा पुरेसा असतो.आणि सामाजिक आंदोलन हे नेहमी पक्ष
  विरहित आणि समस्याग्रस्तांच असल्यामुळे त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा
  वेगवेगळा असू शकतो.महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारणात पडून समाजासाठी काही तरी
  करण्याची उर्मी मुख्यत्वे सुशिक्षित मध्यमवर्गातील तरुण लोकांमध्ये जागृत होण्याचं
  एकमेव कारण म्हणजे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं प्रचंड यश.ह्या आंदोलनाच्या
  राष्ट्रीय पातळीवरील यशस्वीतेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांची राजकीय इच्छाशक्ती
  जागृत झाली.पण हे आंदोलन यशस्वी का झालं याची तठस्थपणे कारणीमीमांसा करण्यात हे
  लोक अपयशी ठरले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्त्यांमुळे त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि
  माध्यमांनी पूर्णवेळ दिलेल्या पाठिंब्या मुळे यशस्वी झालं असा एक गैरसमज(हो गैर
  समजच) त्यांच्यात पसरला.फक्त स्वच्छ चारित्र्याच्या समाजसेवक आणि
  कार्यकर्त्यांच्या जोरावर आंदोलनं यशस्वी होतात काय? याला शुद्ध भाबडेपणा म्हणतात
  ज्याचा फायदा ज्यांच्या हातात पैसा संघटना प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज आहे ते
  कोण आहेत हे वेगळं सांगण्याची बिलकुल गरज नाही त्यांनी घेतला. आम आदमी पक्षा तर्फे लढणारे आणि स्वतंत्रपणे
  निवडणूक लढणारे जेवढे सामाजिक कार्यकर्ते तसेच रामलीला आंदोलनाने झोपेतून जागे
  झालेले उच्च शिक्षित तरुण,अनिवासी भारतीय,आजी माजी प्रशासकीय अधिकारी आणि जे स्वतःला
  अभ्रष्ट आणि चांगले(म्हणजे नेमकं काय?) समजतात त्यांना मिळालेली जेवढी मतं आहेत तेवढयाच
  लोकांचं खरं तर हे आंदोलन होतं असं म्हणायला वाव आहे.ते आंदोलन भ्रष्टाचार विरोधी
  किती होतं आणि सरकार विरोधी किती होतं ते आताच्या निवडणूक निकालांनंतर अगदी स्पष्ट
  झालं आहे याचा अंदाज बांधण्यातही सामाजिक कार्यकर्त्यांनी गल्लत केली.त्याचा
  प्रचंड फायदा प्रबळ विरोधी पक्षात असलेल्या भाजप आघाडीला झाला जे अगदी स्वाभाविकच
  होतं.आंदोलनात ज्या ज्या लोकांनी नेतृत्व केलं आणि व्यासपीठावरून आदर्शवादी भाषण
  दिली ते सर्व नंतर भा ज प मध्ये सामील झाले.काही निवडणूक लढून जिंकून आले तर
  काहींनी बाहेरून पाठींबा दिला आणि यात गैर ही काही नाही आपण असंही म्हणू शकतो की
  चला वी.के.सिंग आणि किरण बेदी सारखी दोन चांगली माणसं राजकारणात आली.खरं तर ह्या
  आंदोलनाने सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांना राजकीय पक्षांच्या समकक्ष आणून
  ठेवलं होतं.पण पक्षीय राजकारणात उतरून राजकीय पक्षांशी दोन हात करण्याचा निर्णय हा
  पूर्णतः आत्मघातकी होता हे आता सिद्ध झालंय.यावरून सामाजिक कार्यकर्त्यांनी
  शिकण्यासारखं बोध घेण्यासारखं बरंच काही आहे.सामाजिक संघटना, समाजसेवक आणि सामाजिक
  कार्यकर्ते यांचा वापर सत्तेसाठी पूर्वीचे राजकारणीही करत होते आणि आता असलेले
  राजकारणीही करून घेत आहेत पण आता पद्धत थोडी सोफिस्टिकेटेड झालीय एवढंच.सामाजिक
  कार्यकर्त्यांनी जनांदोलनाद्वारे राजकारणात प्रवेश केलाय हे स्वागतार्ह जरी असलं
  तरी त्यांनी त्यांच्या चुकीच्या राजकीय खेळी मुळे सामाजिक चळवळींना बाधा येणार
  नाही याचीही जबाबदारी घ्यावी.

 • pravin

  kejariwal ni 02 bedroom cha flat ghetala sagle buddhijivi lokanchya potat dukhayla lagle….election madhe arabo rupaye tv ,rally madhe lavnyat ale ….kahihi pratikriya nahi…. 150 chya var criminals sansad madhe gele …… ek shabda bolayla tayar nahi….

 • Dinesh Wairagade

  sadhya ya vishayvar parkhad mat mandan chuk tarel karan ata pratyekacha dokyat ACCHE DIN AHET pan jasa vel jail tas tas matra aapan realiti shi samore jau. mag kadacht ya lekhala mahatva asel
  pan ek matr khar ki deshala samajsevak he rajkarni manun ata chalt nai ata tyana rajkarni ha rajkarnich hava mag to gharaneshahitun yevo va god father chya madhyamatun..rajkarni matl tr tyal aapn bhut karun swatala dev banvto manje tyani kashi nachaych ani aapan fakt pahaych ani he honyasathi patrata lagate ti samajsevkajaval nasate manun te nako
  he matra nakki zal ki ata parat samajkarni ikde valanar nahi manaje pudhchi kahi varsh tari rajkarnyache kille shabut rahil. bhavishyat changala badal nakki hoil pan khup vel lagel

 • Sada

  It was cruel joke to read article (which highlighted citizen mentatlity) v/s majority of comments where again people tried to pin-point it was social activists’ mistake/ fault/ incapability. :) Comments rather confirmed Vishwambhar ji’s exact point again.
  Thanks for the article Chaudhari sir.

 • Navnath Jadhav

  U all peoples are very good and good minded, no doubt.

  How u can expect to vote from all States=>

  1) AAP Oppose to congress Corrupt Government => Very Good

  2) AAP won in Delhi and Join to Congress => Very Bad (U Won ?)

  3) U r in government, but not able to change anything (U left that government) =>What we got.

  4) WE know some peoples in BJP are Corrupt peoples,But we understand the main leader (MODI) => The person who will change everything slowly.( U peoples was in hurry which could not possible and never. U can give/provide free things, because our government don’t have money now :) . )

  5) Main Thing :- If u was in opposite party in Delhi, then situation might be different.

  We do not have to try things on you, at least now. We need BJP.

 • vaibhav sarpotdar

  phutakal kaarya karnaare barech aahet hya deshaat. Hech phutakal karyakarte(??) udya che rajkiya karyakarte kiva nete banataat. Ekunach samporna janatecha vyavasthe kade baghanya cha drushikon nirashajanak ch aahe.

 • nitin badhe

  Mala Tumcyabaddal Khup Khup Aadar Aahe mala mahiti Aahe tumhi khup Abhyas karunch Bolata. Tumhi je kahi bolala tyala mi 100% sahamat Aahe pan tumhi jya vyktinchi nave ghetali tya baddali mi 100% sahamat aahe ase nahi karan manus pratyek veli aapale vichar badalat Asto mhanun tumche vichar thor aahet pat tya vyaktinchyaa naavan baddal mi kahi bolu shakat nahi

close