मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

May 20, 2014 9:56 AM0 commentsViews: 650

20 मे : राज्यात काल अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस झाल्यानं अनेक भागातला वीजपुरवठाही खंडीत झाला आहे. इचलकरंजी, राधानगरी, चंदगड भागात ढगाळ वातावरण आहे. शेतकर्‍यांनी आता पेरणीची काम सुरु केली आहेत.

दुसरीकडे कर्जत तालुक्यातील काल झालेल्या वादळी पावसाने अनेक घरांचं नुकसान झालं आहे. मानिवली अवसरे, वारे, कळंब अशा 12 गावातल्या सुमारे हजार घरांचे पत्रे उडून गेले आहेत. नुकसानग्रस्त लोकांना ताबडतोब नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेकापचे कर्जत तालुका चिटणीस सुदाम पेमारे यांनी केली आहे.

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातल्यातही नवापूर तालुक्यात काल संध्याकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसात भरडू गावाजवळ वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. हंसराज पाडवी आणि हर्षल वळवी यांचा यात मृत्यू झाला आहे.आता नंदुरबारमध्ये पाऊस थांबला आहे, मात्र नवापूर तालुक्यात शेतीचं बरंच नुकसान झालं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close