जात-धर्माचं राजकारण करणार्‍यांपासून सावध राहा : प्रियांका गांधी यांचं आवाहन

April 11, 2009 7:14 AM0 commentsViews: 1

11 एप्रिल प्रियांकागांधी यांची अमेठी मध्ये प्रचार सभा सुरु आहे. राहुल गांधी अमेठीमधून उमेदवार म्हणून उभे आहेत. राहुल गांधीसाठी बहिण प्रियांकाही प्रचारात उतरली आहे. काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल देशभरात दौरे करत असल्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी अमेठीत आल्याचं सागूनप्रियांका गांधी यांनी अमेठीतून प्रचाराला सुरूवात केली.सासर्‍यांच्या निधनामुळे प्रियांका उशिरा प्रचारात उतरल्या असल्या तरी अमेठीतल्या लोकांनी मात्र इंदिरा गांधीच्या या नातीचं जोरदार स्वागत केलं. जाती- धर्माचं राजकारण खेळून तमाशा करणार्‍यांपेक्षा धर्मनिरपेक्ष काँग्रेसला निवडून देण्याचं आवाहन यावेळी प्रियांका गांधी यांनी केलं आहे. प्रचारसभेदरम्यान जात-धर्माचं राजकारण करणा-यांपासून सावध राहण्याचं आवाहन करताना प्रियांका गांधी यांनी मायावतींच्या सरकारवरही टीका केली. असं असलं तरीही 'मतं मिळवण्यासाठी मात्र कोणत्याही गैरमार्गाचा आधार घेणार नाही ,माझी भूमिका पटल्यास आणि आश्वासनांवर विश्वास असल्यास मतदारांनी मतं द्यावीत ', असं प्रियांका गांधी यांनी प्रचारसभेदरम्यान स्पष्ट केलं.

close