सहा फूट लांबीची लोखंडी सळी घुसूनही रेहान वाचला

April 11, 2009 10:50 AM0 commentsViews: 9

11 एप्रिल, भिवंडी ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात चौथीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याच्या छातीत सहा फूट लांबीची लोखंडी सळी घुसल्याची घटना घडली आहे. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांनी या मुलाला जीवदान मिळालं आहे. रेहान अन्सारी असं या मुलाचं नाव असून तो सलाउद्दीन आयुबी हायस्कूलमध्ये शिकतो. शाळेच्या बांधकामाचं साहित्य हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यातलीच सळी रेहानच्या छातीत घुसली. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडलाय. सिराज हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी तातडीनं ऑपरेशन करून रेहानचे प्राण वाचवले.

close