पराभवावर ‘मनसे’ चिंतन, 31 मेला राज घेणार सभा

May 20, 2014 7:01 PM0 commentsViews: 3681

98raj_thakarey_420 मे : लोकसभा निवडणुकीत मनसेची ‘औकात’ दाखवून देईन अशी गर्जना करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलाच पराभवाचा हादरा बसलाय. मनसेचे सर्वच्या सर्व दहा उमेदवार पराभूत झाले आहे. पराभवाची दखल घेत राज ठाकरे यांनी आपल्या सर्व शिलेदारांची चिंतन बैठक घेतली. मुंबईतील पक्षाच्या राजगड या मुख्यालयावर ही बैठक पार पडली.

या बैठकीत पराभव का झाला याचं चिंतन करण्यात आलं. तसंच जनतेला सामोरं जाण्यासाठी 31 मे रोजी जाहीर सभा घेणार असल्याचं ठरलंय. या बैठकीला मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि आमदार उपस्थितीत होते. निवडणुकीत राज यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत दहा ठिकाणी आपले उमेदवार उतरवले होते. विशेष म्हणजे मागील निवडणुकीप्रमाणे याहीही वेळी मनसेनं आपले उमेदवार शिवसेनेच्या विरोधात उतरवले होते.

मात्र सेनेनं मनसेला सातवे आसमान दाखवत चारीमुंड्या चीत केलं. मुंबईत महायुतीने सर्व सहाच्या सहा जिंकून दाखवल्यात तर मनसेचे मुंबईतले सर्व उमेदवार पराभूत झाले. एवढंच नाहीतर दहाही उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं. मनसेचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे. यामुळे राज यांनी चिंतन बैठक बोलावली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close