शहीद उत्तम भिकलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

May 20, 2014 7:37 PM0 commentsViews: 1208

20 मे : शहीद उत्तम भिकले यांच्यावर कोल्हापुरातल्या हडलगे या त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी ‘शहीद उत्तम भिकले अमर रहे’ च्या घोषणा देत या शूर जवानाला निरोप दिला. जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी दुपारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्हातल्या हडलगे या गावातले उत्तम भिकले यांना वीरमरण आलं. उत्तम भिकले हे 2002 साली मराठा लाईट इन्फ्रन्ट्री कोल्हापूरमधून सैन्य दलात भरती झाले होते. त्यांचं पार्थिव आज (मंगळवारी) सकाळपर्यंत हडगले या गावात आणण्यात आलं. त्यांच्यावर दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close