आयबीएन लोकमत इम्पॅक्ट – वर्ध्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातल्या कर्मचा-यांवर कारवाई

April 11, 2009 11:01 AM0 commentsViews: 9

11 एप्रिल, वर्धा सगळीकडं निवडणुकीची धामधूम असताना आचारसंहितेकडे दुर्लक्ष करत वर्ध्यात सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात कर्मचारी ओल्या पार्टीत रंगले होते. ही बातमी 'आयबीएन लोकमत'नं दिली होती. त्यानंतर वर्ध्याच्या जिल्हाधिका-यांनी कर्मचा-यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. वर्ध्यातल्या प्रशासकीय भवनात दुसर्‍या मजल्यावर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांचं ऑफिस आहे. शुक्रवारी सुट्टी असल्यानं या इमारतीतले बहुतांश ऑफिसेस बंद होते. पण, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या ऑफिसमध्ये मात्र दारूच्या बाटल्या फोडून मटनावर यथेच्छ ताव मारला जात होता. या पार्टीत मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी एस.टी. चोरे, मत्स्य क्षेत्रीय कर्मचारी किसन चांदेकर, व्ही.डी. चांदेकर आणि लिपिक सीताराम भोयर हे सामील होते. पत्रकारांनी अचानक भेट देऊन ही बाब उजेडात आणली. पत्रकारांनी कॅमेरे बाहेर काढताच पार्टीत सहभागी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तोंड लपवत पळ काढला.

close