मोदी मुख्यमंत्रीपदातून मुक्त, आनंदीबेन पटेल नव्या मुख्यमंत्री

May 21, 2014 3:51 PM0 commentsViews: 1289

5788modi_patel21 मे : गुजरातचे तब्बल 13 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहणारे नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल कमला बेनीवाल यांच्याकडे मोदींनी आपल्यापदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. राजीनामा सोपवल्यानंतर मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ गुजरात टाऊन हॉलमध्ये दाखल झाले असून गुजरात सरकारची विधिमंडळाची बैठक सुरू झालीय.

या बैठकीत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आनंदीबेन पटेल यांनी निवड करण्यात आली. पहिल्यांदाच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी एखाद्या महिलेची निवड करण्यात आली.  आनंदीबेन पटेल यांचं नाव सुरुवातीपासून चर्चेत होतं अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झालं असून गुजरातला आनंदीबेन पटेल या पंधराव्या मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी आनंदीबेन पटेल यांचं अभिनंदन केलं असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिला आहेत.

त्यापूर्वी गुजरात विधानसभेनी भावपूर्ण निरोप दिला. गुजरातच्या अनेक आमदारांनी आपल्या भाषणांत मोदींचं कौतुक केलं आणि त्यांना पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मोदी आपल्या कारकीर्दीबद्दल बोलताना भावुक झाले. मी कुठे चुकलो असेन, तर मला माफ करा, मी विधानसभेत जास्त बोललो नसेन, पण मी सर्वांचं ऐकून घेतलं. अगदी विरोधीपक्षातल्या नेत्यांचंसुद्धा मी ऐकून घेतलंय असं सांगताना मोदींना गहिवरुन आलं. आता पंतप्रधान कार्यालयातही गुजराती बोललं जाईल आणि खमण ढोकळा आणि खाकरा खालला जाईल असंही मोदी गमतीत म्हणाले. मोदींच्या निरोप समारंभासाठी आज गुजरात विधानसभेचं विशेष अधिवेशवन बोलवण्यात आलं होतं. तर गुजरात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांनी मोदींचं तोंडभरुन कौतुक करत भरपूर टोलेही लगावले. आता तुम्हाला बहुमत मिळालंय, आता राम मंदिर बांधा, गुजरातसाठी भरपूर निधी द्या, अशी आग्रहाची मागणी वाघेला यांनी केली.

आनंदीबेन पटेल यांचं अल्पपरीचय

 • - आनंदीबेन जेठाभाई पटेल
 • - जन्म 21 नोव्हेंबर 1941
 • - 1998 पासून गुजरातमध्ये आमदार
 • - अहमदाबादमधल्या मंडलमधून आमदार म्हणून निवडून आल्या
 • - 1987 पासून भाजपच्या सदस्य
 • - सध्या त्यांच्याकडे रस्ते आणि इमारत, नगरविकास, गृहनिर्माण, आपत्ती व्यवस्थापन ही खाती होती
 • - मोदींच्या सरकारमधल्या महत्त्वाच्या मंत्री
 • - गेल्या 4 वेळा त्या आमदार म्हणून निवडून आल्यायत
 • - गुजरात सरकारमधल्या एकमेव महिला मंत्री
 • - 1994 मध्ये गुजरातमधून राज्यसभेच्या खासदार
 • - मेहसाना जिल्ह्यातल्या विजापूर तालुक्यातल्या खारोड गावात जन्म
 • - जिल्ह्यात इतर शाळा नसल्यानं 700 विद्यार्थ्यांच्या मुलांच्या शाळेत एकटी मुलगी शिक्षण घेणारी

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close