अंधेरीत एमआयडीसी पोलिसांनी पकडली मुलींची तस्करी

April 11, 2009 11:22 AM0 commentsViews: 2

11 एप्रिल, मुंबई मुंबईतल्या अंधेरी भागात रात्री एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून पाच मुलींना ताब्यात घेतलं. आपल्याला फसवून मुंबईत आणण्यात आलंय, अशी माहिती या मुलींनी फोनवरून महाराष्ट्र घरकामगार महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने या मुलींना सोडवण्यात आलं. यातल्या दोन मुलींची वयं 16 वर्षं असून त्यांना 15 हजार रूपयांना विकलं असल्याचं त्या मुलींनीच सांगितलंय. या मुलींना एमआयडीसी परिसरात कोंडून ठेवण्यात आलं होतं.

close