निवडणुकीच्या प्रचारसभेत चिरंजीवीचा स्टंट

April 11, 2009 12:17 PM0 commentsViews: 1

11 एप्रिलवेगवेगळे स्टंट चित्रपटात दाखवणारा दाक्षिणात्य स्टार चिरंजीवीनं त्याच्या प्रजाराज्यम या पक्षाच्या प्रचारालाही जरा हटके सुरुवात केलीये. तो निवडणुकीच्या प्रचारयात्रेत आपल्या प्रजाराज्यमची प्रजा घेऊन थेट रेल्वेच्या इंजिनावरच स्वार झाला होता. त्यानंतर सिकंदराबाद ते काझीपेठ अशी प्रचारयात्राही काढली. चिरंजीवीच्या प्रजाराज्यमचं निवडणूक चिन्ह आहे रेल्वेचं इंजीन. कधी चालत्या रेल्वेवर, तर कधी टपावरून वेगवेगळे स्टंट चित्रपटात दाखवणारा दाक्षिणात्य स्टार चिरंजीवीची यावेळी निवडणुकीच्या मैदानातली अशी हटके प्रचार सभा गाजणार एवढं नक्की.

close