गुजरातचा ‘निरोप’ घेताना मोदी झाले भावुक

May 21, 2014 2:57 PM0 commentsViews: 1055

9090gujarat_modi21 मे : गुजरात म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे गुजरात असं समीकरण बनलंय. आज मोदींनी आपल्या लाडक्या गुजरातचा निरोप घेतला. मोदींनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलाय. नव्या मुख्यमंत्री म्हणून आनंदीबेन पटेल यांची निवड करण्या आलीय. त्यापुर्वी मोदींना गुजरात विधानसभेने भावपूर्ण निरोप दिला.

गुजरातच्या अनेक आमदारांनी आपल्या भाषणांत मोदींचं कौतुक केलं आणि त्यांना पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मोदी आपल्या कारकीर्दीबद्दल बोलताना भावुक झाले. मी कुठे चुकलो असेन, तर मला माफ करा, मी विधानसभेत जास्त बोललो नसेन, पण मी सर्वांचं ऐकून घेतलं. अगदी विरोधीपक्षातल्या नेत्यांचंसुद्धा मी ऐकून घेतलंय असं सांगताना मोदींना गहिवरुन आलं. आता पंतप्रधान कार्यालयातही गुजराती बोललं जाईल आणि खमण ढोकळा आणि खाकरा खालला जाईल असंही मोदी गमतीत म्हणाले.

मोदींच्या निरोप समारंभासाठी आज गुजरात विधानसभेचं विशेष अधिवेशवन बोलवण्यात आलं होतं. तर गुजरात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांनी मोदींचं तोंडभरुन कौतुक करत भरपूर टोलेही लगावले. आता तुम्हाला बहुमत मिळालंय, आता राम मंदिर बांधा, गुजरातसाठी भरपूर निधी द्या, अशी आग्रहाची मागणी वाघेला यांनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close