गडकरी मानहानी खटला, केजरीवालांची तिहार जेलमध्ये रवानगी

May 21, 2014 5:18 PM0 commentsViews: 4444

898kejriwal21 मे : लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झाल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल आज पहिल्यांदाच समोर आले. पण त्यांनी आणखी एक नवं नाट्य उभा केलंय. भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केल्या प्रकरणी केजरीवाल यांनी जामीन घेण्यास नकार दिला त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असून 23 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. केजरीवाल यांची तिहार कारागृहात रवानगी करण्यात आलीय.

‘आप’ने गडकरींच्या नावाचा समावेश देशातल्या भ्रष्ट नेत्यांच्या यादीत केला होता. त्यानंतर गडकरींनी केजरीवाल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर आज दिल्ली कोर्टात सुनावणी झाली. यावेळी केजरीवाल यांनी जामीन घ्यायला नकार दिला. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. त्यानंतर त्यांना पतियाळा हाऊस कोर्टाच्या लॉक अपमध्ये कडक बंदोबस्तात ठेवण्यात आलंय. सुनावणीदरम्यान, केजरीवालांवर कोर्टाने कडक ताशेरे ओढले. पक्षकाराच्या म्हणण्यानुसार कोर्ट चालत नाही. एखादा पक्षकार जाणूनबुजून नियमांचं उल्लंघन करत असेल कोर्ट बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असं न्यायमूर्ती यांनी सुनावलं. या प्रकरणाला वेगळं न मानता इतर गुन्हेगारी खटल्यांप्रमाणेच त्याच्याकडे पाहिलं जाईल, असं कोर्टाने बजावून सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close