केजरीवालांचा ड्रामा, कार्यकर्त्यांचा जेलबाहेर धिंगाणा

May 21, 2014 10:30 PM0 commentsViews: 1578

gf645arvind kejriwal arrest

21 मे : लोकसभेत दारुण पराभवानंतर आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल आज पहिल्यांदाच मीडियासमोर आले सकाळी त्यांनी दिल्लीकरांची माफी मागितली तर दुपारी भलताच ड्रामा उभा केला. केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि त्यांची रवानगी सध्या तिहार जेलमध्ये करण्यात आलीय. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिहार जेलबाहेर निदर्शनं, घोषणाबाजी आणि आंदोलन सुरू केलंय. जेलबाहेर आपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी कार्यकर्त्यांनी हुसकावून लावले यावेळी सौम्य लाठीमारही करावा लागला.

आम आदमी पार्टीने भ्रष्टाचारविरोधी मोहीम उघडली होती. केजरीवाल यांनी भ्रष्ट नेत्यांची यादीच जाहीर केली. त्यावेळी आपने भाजप नेते नितीन गडकरी आणि त्यांच्या पूर्ती ग्रुपवर आरोप केले होते. या प्रकरणी गडकरींनी केजरीवाल यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. यावर आज दिल्लील्या पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी झाली.

पण, केजरीवाल यांनी जामीन भरायला नकार दिला. यावेळी कोर्टानं त्यांना फटकारलं. पक्षकाराच्या म्हणण्यानुसार कोर्ट चालत नाही. एखादा पक्षकार जाणूनबुजून नियमांचं उल्लंघन करत असेल तर कोर्ट बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, अशा शब्दात कोर्टाने त्यांना समज दिली आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर त्यांना तिहारच्या जेल नंबर 4 मध्ये नेण्यात आलं. यामुळे संतापलेल्या आपच्या नेत्यांनी तिहार जेलबाहेर गर्दी केली. योगेंद्र यादव यांच्यासह आपचे अनेक नेते जेलबाहेर जमले.

त्यांना तिथून बाजूला काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. जवळपास 70-80 कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यता आलंय. पोलिसांनी तिहार जेलबाहेर जमावबंदी लागू केलीय. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचं हे राजकारण चुकीचे असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलीय.

यापूर्वीही अरविंद केजरीवाल वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले त्यांचीही नौटंकी

– केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांनी विधानसभेत शपथ घेण्याऐवजी रामलीला मैदानावर शपथ घेतली होती
– मुख्यमंत्री झाल्यावर अरविंद केजरीवाल यांनी लोकांना भ्रष्ट नेत्यांविरोधात स्टिंग ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता
– लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जनता दरबारचं आयोजन केलं. या जनता दरबारामध्ये फक्त गोंधळच झाला. त्यामुळे जनता दरबार अर्धवटच संपवावा लागला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close