फिल्मफेअरचा हॉट इश्यू

April 11, 2009 12:26 PM0 commentsViews: 6

11 एप्रिलफिल्मी दुनियेची हॉट गॉसिप देणार्‍या फिल्मफेअरचा एक नवा हॉट इश्यू नुकताच प्रकाशित झाला आहे. एप्रिलच्या या हॉट सीझनप्रमाणेच हा इश्यूही हॉट आहे. या हॉट सिझनला साजेसं कव्हर पेजही हॉट आहे…त्यावर बॉलिवुडची हॉट गर्ल बिपाशा बासू आहे. फिल्म फेअरच्या या नव्या आवृत्तीचं प्रकाशन बिपाशा बसूच्याच हस्ते करण्यात आलं. पण कार्यक्रमात खरी रंगत आणली ती बिपाशा बासूच्या इंटरव्ह्यूने. इंडस्ट्रीमध्ये इतर स्टार्सशी असलेल्या तिच्या संबंधांबद्दल तिने सांगितलं. बोलताना तिने ऐश्वर्या राय- बच्चन, प्रियांका चोप्रा यांचंही कौतुक केलंं. बिपाशाच्या ब्युटीचं कोणी कितीही कौतुक करो. पण ती मात्र कौतुक इतर अभिनेत्रींचं करत होती. ऐश्वर्या राय- बच्चन बद्दल बोलताना,'ऍश ही मला नेहमीच सुंदर वाटते',असं म्हटलं. तर प्रियांकाची स्तुती करताना 'प्रियांका प्रत्येक सिनेमात हॉट दिसते. ती स्वत:ला छान मेन्टेन करते'. हे ऐकल्यावर इंडस्ट्रिमध्ये स्टार्सचं पटत नाही, ही गोष्ट बिपाशानं खोटी ठरवली आहे. बिपाशाला तिचा लकी बॉय कोण आहे, विचारल्यावर तिने चक्क प्रियकर जॉनचं नाव न घेता रणबीर कपूरचं नाव घेतलं. तो युथ आयकॉन आहे, देखणा दिसतो आणि चांगला अभिनेताही असल्याचं तिने मान्य केलं. आता या गोष्टीवरून जॉन रागावणार तर नाही ना हा एक नवाच इश्यू होईल.

close