लालूंचा नितीशकुमारांना पाठिंबा

May 22, 2014 2:18 PM0 commentsViews: 1364
lalu and nitish
22 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे बिहारमध्ये कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार एकत्र  आले आहेत.
भाजपला मिळालेलं यश आणि या दोन्ही पक्षांचा झालेला दारूण पराभव या पार्श्वभूमीवर हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकत्र आलेत. लोकसभा निवडणुकीत पराभवाची जबाबदारी स्वीकारून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर बिहारच्ये मुख्यमंत्रीपदासाठी जीतन राम मांझी यांची निवड करण्यात आली आहे.
त्यानंतर आता एकमेकांचे विरोधक असलेले लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहेत. लालूंच्या आरजेडीने बिहार सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये जेडीयूला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close