पराभवावर चर्चा करण्यासाठी अनेक पक्षांच्या बैठका सुरू

May 22, 2014 11:41 AM0 commentsViews: 453

baithaka22 मे :  लोकसभेत झालेल्या दारूण पराभवाची चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या बैठका होताहेत. काँग्रेसनं मुंबईत जिल्हा समित्यांची बैठक बोलावली आहे. नांदेड आणि हिंगोली लोकसभेमध्ये कशा पद्धतीने काँग्रेसने मोदी लाट थेपवली यासंदर्भात देखील चर्चा होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी औरंगाबाद, जालना, नंदुरबार आणि लातूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार्य केलं नसल्याची सर्व पदाधिकार्‍यांची भावना आहे.

दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे. लोकसभेतल्या दारूण पराभवाचीही कारणमीमांसा या बैठकीत होणार आहे. लोकसभेत कुठे मतदान कमी झाल आणि त्याची कारण काय याचा शोधही या बैठकीत घेतला जाणार आहे

मनसेचीही कामगिरी निराशाजनक राहिल्याने त्यावर विचार करण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातल्या पदाधिकार्‍यांची बैठक आज राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात सुरू होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close