अर्ज छाननीमध्ये कीर्तिकरांचा फॉर्म ठरला वैध

April 11, 2009 12:37 PM0 commentsViews: 2

11 एप्रिल 3-ए या फॉर्मवर सही न केल्यानं अडचणीत आलेले शिवसेनेचे उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातले उमेदवार गजानन कीर्तिकर यांचा अर्ज वैध ठरला आहे. विरोधकांनी 3-ए या फॉर्मवर सही न केल्याच्या बाबीवर आक्षेप घेऊन त्यांची उमेदवारी अवैध ठरवण्याची मागणी केली होती. पण निवडणूक अधिकार्‍यांनी 3-ए या अर्जाची छाननी करण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांच्या अर्जावर घेतलेले आक्षेप किंवा त्रूटी या त्यांचा अर्ज बाद करण्याइतपत महत्त्वाच्या नाहीत, असं निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितलंय. त्यामुळे गजानन कीर्तिकरांचा अर्ज आता वैध ठरला असून शिवसेनेलाही दिलासा मिळाला आहे.

close