राजना CM पदाचे उमेदवार घोषित करा, मनसेसैनिकांचा सूर

May 22, 2014 7:23 PM3 commentsViews: 6978

65mns_raj22 मे : लोकसभा निवडणुकीत मतदारांनी ‘औकात’ दाखवल्यानंतर मनसेनं आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. विधानसभेला कसं सामोरं जावं यासाठी आता मनसेनं भाजपची स्टाईल कॉपी केलीय. विधानसभेसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावं अशी मागणीच मनसेसैनिकांनी केलीय.

मनसेच्या पदाधिकार्‍यांची आज (गुरुवारी) मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्याची मागणी करण्यात आली. आपला पक्षाध्यक्ष मुख्यमंत्री व्हावा हे कोणत्याही कार्यकर्त्यांला आनंदाची गोष्ट आहे. विधानसभेसाठी जनतेसमोर जाण्यासाठी राज ठाकरे हे सक्षम पर्याय आहे. त्यामुळे पदाधिकार्‍यांची ही मागणी राज ठाकरेंच्या कानावर घालणार असल्याचं आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय.

मनसेची कामगिरी या निवडणुकीत निराशाजनक राहिली अनेक ठिकाणी तर मनसे उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं. याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीला राज ठाकरे उपस्थित नव्हते. या अगोदर राज यांच्या उपस्थित मनसेची बैठक दोन दिवसांअगोदर झाली त्यात पराभवावर चिंतन करण्यात आलं. तसंच येत्या 31 मे रोजी मुंबई राज जाहीर सभा घेणार असल्याचं ठरलंय.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली होती. मोदी यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे आज एनडीएचा दणदणीत विजय झाला. त्याची नक्कल करत आता मनसेनंही राज यांना मुख्यमंत्रीपदाचं उमेदवार जाहीर करावं यासाठी गळ घातलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vishal Patil

    मनसे ने एवढ्या लवकर घाई करायला नको पहिला नाशिकमध्ये उरलेल्या २ १/२ वर्षात अतिउत्तम काम करावं मग ते काम घेऊन जनतेपुढे जावं अन लोकसभा आणि विधानसभा राज ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे करावं. कारण आती घाई संकटात नेई….

  • Kumar Jadhav

    he batmi jyani lihli aahe tyache nakkich manse pasun pott dukhte karan tyachya nivval propaganda haach manse virodhi aahe …..Kahi upyog nahi honaar tumchya hya bakkwass manse virodhi propaganda che …je Shiv sene che ani BJP che zhale tech hoil ……amhich Nivdun yevu aadhik zomane

  • Balaji

    राजसाहेब मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रासाठी हा सुवर्णयोग.

close