एसी मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी

April 11, 2009 2:05 PM0 commentsViews: 7

11 एप्रिलयंदा अनेक कंपन्यांनी अर्थिक मंदीची लक्षणं आणि परिणाम पाहून एसीच्या दरांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी एसी खरेदीसाठी इलेक्ट्रॉनिक शोरुम्सकडे जरा जास्तच लोकांचा मोर्चा वळत आहे. यंदा खरेदीदारांचा कल स्प्लिट एसीकडे जास्त असल्याचं सुमेरियाचे स्टोअर मॅनेजर शेख अय्याझ यांनी सांगितलं. विंडो एसीच्या तुलनेत स्प्लिट एसीला जागा कमी लागते आणि त्याचे फायदेही जास्त आहेत. तसंच एनर्जी एफिशिअंट म्हणजे वीज बचतीची नवीन टेक्नॉलॉजी असणार्‍या एसीसाठीही ग्राहक चौकशी करत आहेत.मार्केटमध्ये पाऊण ते दोन टन वजनाचे आणि 80 ते 240 स्वेअरफिटसाठी उपयुक्त असणारे अनेक कंपन्यांचे एसी उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती तेरा ते छत्तीस हजारापर्यंत आहेत. वाढत्या उन्हाळ्यासोबत खरेदीदारही वाढताहेत. एकतर जागतिक मंदी तसंच वाढते खरेदीदार पाहता कंपन्यांनी किमतीही कमी केल्या आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा एसींच्या विक्रीमध्ये ऐंशी टक्के वाढ झालीय असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. एसी कसा वापरावा ? एसी बसवून घेतल्यानंतर त्याची काळजी घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी कमी कुलिंगसाठी तापमान 24 डिग्रीवर ठेवा. एसीचा फिल्टर प्रत्येक महिन्याला स्वच्छ करा . शक्यतो ऑटोमॅटिक टेंपरेचर कट ऑफ असा पर्याय असलेला एसी बसवा. एसीचा रेग्युलेटर लो-कुलिंगवर ठेवा. जमल्यास एसीच्या मशिनवर शेड किंवा झाडाची सावली येऊ द्या त्यामुळे 10% वीज बचत होईल. तसंच एसीची हवा पसरवण्यासाठी जवळच सिलिंग फॅन लावा. थोडक्यात कमी वीजेत एसी वापरा.

close