राणेंची चिंतन बैठकीला दांडी, मुख्यमंत्री ठरावही रद्द

May 22, 2014 10:30 PM0 commentsViews: 1568

naryan rane on nitish twit22 मे : लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गात निलेश राणे यांच्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये उद्योग मंत्री नारायण राणे यांचं नाराजीनाट्य अजूनही सुरूच आहे. प्रदेश काँग्रेसने आज सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाची चिंतन बैठक बोलवली होती.

 

त्यावर राणे, त्यांचा मुलगा निलेश राणे यांच्यासह सिंधुदुर्ग काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांनी बहिष्कार घातला. त्यामुळे ही बैठक रद्द करण्याची नामुष्की प्रदेश काँग्रेसवर ओढवली. यानिमित्ताने राणे आणि समर्थकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.

 

दरम्यान, राणे यांना मुख्यमंत्री करण्याचा सिंधुदुर्ग काँग्रेसचा ठराव प्रदेश काँग्रेस रद्द केला आहे. राणे पिता-पुत्रासह इतर पदाधिकार्‍यांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, असा दबाव मुख्यमंत्र्यांच्या गटाकडून प्रदेशाध्यक्षांवर टाकला जात आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close