मोदींच्या शपथविधीला नवाझ शरीफ राहणार हजर?

May 23, 2014 12:39 PM0 commentsViews: 727

Modi and sharif 23 मे :  पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी भारतात येणार असल्याची माहिती IBN नेटवर्कला मिळाली आहे. सोमवारी हा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यासाठी मोदींनी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण दिलं आहे. याविषयीची अधिकृत भूमिका पाकिस्तान सरकारकडून आज सकाळीच जाहीर करण्यात येईल.

गेल्या दोन वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध ताणले गेलेत, त्या पार्श्वभूमीवर नवाझ शरीफ मोदींच्या आमंत्रणाचा स्वीकार करतात की नाही याविषयी उत्सुकता आहे. त्यातच शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटामध्येच यावरून दोन गट पडले होते.

शरीफ भारतभेटीवर आल्यास पाकिस्तानातले मुल्ला मौलवी आणि मूलतत्ववादी गट नाराज होतील, दुसरीकडे ते आले नाहीत तर, ते आयएसआय आणि सैन्याच्या दबावापुढे झुकले असा संदेश जगात जाईल अशा कात्रीत ते सापडले होते. अखेरीस सर्व सल्लागारांचा सल्ला झुंगारून त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. मात्र, त्यांचं वेळापत्रक निश्चित झालेलं नाही. ते थोडाच वेळासाठी भारतात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

मोदींचे पाहुणे : तीन हजार मान्यवरांना निमंत्रण

राजकीय परदेशी पाहुणे

 • पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ
 • श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे
 • बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना
 • नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला
 • मालदीवचे राष्ट्रपती अब्दूल गयूम
 • अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हामिद करजाई

राजकीय पाहुणे

 • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
 • तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता
 • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
 • हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिुंह हुडा
 • जम्मू -काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला
 • आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई
 • बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी
 • केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी
 • सरसंघचालक मोहन भागवतभाजपचे सर्व प्रदेशाध्यक्ष

बॉलिवूडचे पाहुणे

 • रजनीकांत
 • लता मंगेशकर
 • रेखा
 • सलमान खान

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close