अफगाणिस्तान – हेरातमध्ये भारतीय वकिलातीवर हल्ला

May 23, 2014 10:18 AM0 commentsViews: 1158

afghanistan attack

23 मे :  अफगाणिस्तानमधील हेरात येथल्या भारतीय वकिलातीवर आज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्लेखोरांसोबत चकमक अजूनही सुरू असून या चकमकीत एका सुरक्षा जवानाचा तर दोन दहशतवादी मारले गेले आहेत अशी माहीती हेरातच्या पोलीस प्रमुखांनी दिली आहे.

हेरात इथे भारतीय वकिलातीवर पहाटे 3:45च्या सुमारास हा हल्ला झाला. गोळीबार आणि ग्रेनेडनेचा स्फोट करत 3 हल्लेखोरांनी दूतावासात प्रवेश केला. आणखीन 4 तालिबानी दहशतवादी 100 – 120 मीटर्सवरच्या शेजारच्या इमारतीत लपले असून तिथून ते रॉकेट लाँचर्स आणि ग्रेनेड्सनी वकिलातीवर हल्ला करतायत. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा भारतीय गुप्तचर संस्थांचा कयास आहे.

या हल्लात अनेक जण जखमी झाल्याची भीतीही वर्तवली जात आहे. तर वकिलातीतले सर्व नागरीक सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी दिली आहे.

दरम्यान, पाकिस्ताननं या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन या हल्ल्याचा निषेध केला आहे. मोदी म्हणाले,’अफगाणिस्तानातल्या भारतीय वकिलातीवरच्या हल्ल्याचा मी निषेध करतो. अफगाणिस्तानमधील भारतीय वकिलातीवर आमची बारीक नजर आहे. तिथल्या राजदूत सुजाता सिन्हा यांच्याशीही फोनवरुन चर्चा केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close