यंदाच्या आयपीएलमध्ये बुकींचा 2 खेळाडूंशी संपर्क- गावसकर

May 23, 2014 11:41 AM0 commentsViews: 657

sunil gavaskar

23 मे :  सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या सातव्या सीझनमध्ये फिक्सिंगचे प्रकार घडले असते असा धक्कादायक खुलासा बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सुनील गावसकर यांनी केला आहे. यूएईमध्ये खेळवल्या गेलेल्या आयपीएलच्या पहिल्या भागात बुकींनी दोन खेळाडूंना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती सुनील गावसकर यांनी दिली आहे. या खेळाडूंनी लगेच आयपीएल अधिकार्‍यांना या संदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर आयपीएलने आयसीसीच्या अँटी करप्शन विभागाकडे या प्रकरणाची माहिती दिल्याचंही गावसकर यांनी म्हटलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close