नॅनो घ्या, बक्षिस मिळवा

April 11, 2009 2:13 PM0 commentsViews: 6

11 एप्रिलनॅनोसाठी इतके दिवस थांबल्यावर आता ग्राहकांना त्याचा फायदाही मिळणार आहे कारण टाटा ग्रुपच्या कोणत्याही स्टोअरमधून नॅनोचं बुकिंग केल्यावर ग्राहकांना विविध आकर्षक भेटवस्तू दिल्या जात आहेत. टाटांच्या वेस्टसाईड स्टोअरमध्ये नॅनो पहायला गर्दी होत आहे. टाटा ग्रुपच्या कोणत्याही ब्रँडच्या शोरुममध्ये सध्या नॅनोच्या बुकिंग फॉर्मची चौकशी करण्यासाठी ग्राहकांची रांग दिसत आहे. नॅनो बघण्यासाठी आलेल्या या ग्राहकांचं लक्ष इतर प्रॉडक्ट्सकडे वळवण्यासाठी स्टोअरमध्ये अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. इथे कपडे, फूटवेअर आणि होम ऍक्सेसरीजवर 15 ते 20 टक्के सूट मिळत आहे. टाटांच्या क्रोमा स्टोअरमध्येही अशाच प्रकारच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. नॅनोचा तीनशे रुपयांचा फ़ॉर्म घेतल्यावर इथं कोणतीही वस्तू विकत घेतली तर त्यावर तीनशे रुपये सूट दिली जात आहे. टायटन शॉपमध्येही फॉर्म खरेदी केल्यावर दोनशे रुपयांचं गिफ्ट व्हाऊचर दिलं जातं. तर टाटा इंडिकॉममध्ये नॅनोचा फॉर्म घेतल्यावर तीनशे रुपयांचं कूपन मिळेल,जे टाटा इंडिकॉमचा वॉकी-टॉकी, फोटॉन ब्रॉडब्रँड आणि यूएसबी प्लगच्या खरेदीसाठी ग्राहक वापरु शकतील. प्री पेड आणि पोस्ट पेड ग्राहक देखील या कुपनच्या ऐवजी तेवढा टॉकटाईम घेऊ शकतील. नॅनो मार्केटमध्ये येण्याआधीपासूनची लोकप्रियता टाटा ग्रुपनं चांगलीच कॅश केली आहे आणि त्यातच ग्राहकांवर अशा ऑफर्सची बरसात करून नॅनोचे ग्राहक वाढवणं हेच आता कंपनीचं उद्दिष्ट आहे.

close