पुण्यातल्या लोकसेवा बँकेवरही आर्थिक निर्बंध

May 23, 2014 12:04 PM0 commentsViews: 893

deepak paygude_3-87723 copy

 23 मे :  मुंबईतल्या सीकेपी बँकेच्या आलेल्या आर्थिक निर्बंधानंतर आता पुण्यातल्या लोकसेवा बँकेवरही रिझर्व बँकेच्या आदेशानुसार आर्थिक निर्बंध आलेत. पुण्यातले मनसेचे उमेदवार आणि मनसेचे नेते दिपक पायगुडे हे अध्यक्षपदी असणार्‍या लोकसेवा बैंकेवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत.तसंच पायगुडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ देखिल बरखास्त करुन बैंकेवर प्रशासकाची नेमणुक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिझर्व बैंकेच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे ठेविदारांना आता फक्त 6 महिन्यातून केवळ 1000 रूपये काढता येणार आहे. गेल्या वर्षी बैंकेचं ऑडीट झालं. यावेळी बैंकेच्या ठेवी आणि कर्जाचे प्रमाण नियमापेक्षा अधिक झाल्याचं समोर आलं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता ठेवीदार मात्र अडचणीच सापडले आहेत आणि आता त्यांना एका वेळी फक्त एक हजार रुपयेच काढता येणार आहेत. पण या सगळ्यानंतरही पायगुडेंनी मात्र ठेवीदारांनी काळजी करु नये असं सांगितलं आहे.

‘बैंकेमध्ये कोणताही घोटाळा नाहीय आणि येत्या महिनाभराच्या आत हे सगळं कर्ज वसुल होईल’ असंही पायगुडेंचं म्हणणं आहे आणि त्यानंतर बैंकेवरचं हे संकट दूर होऊन ठेवीदारांना त्यांचे पैसे परत दिले जातील असा विश्वास ते व्यक्त केला आहे. पण दुसरीकडे ठेवीदार मात्र हवालदिल झाले आहेत. आयुष्यभराची पुंजी बैंकेत ठेवली आहे. आता काय करायचं असा प्रश्न ते विचारतायत.

close