सेनेचा ‘वाघ’, खर्‍या वाघाचा ‘पालक’!

May 23, 2014 2:07 PM0 commentsViews: 5391

23 मे :  उदय जाधव, मुंबई.

जंगलचे राजे असणारे सिंह, वाघ, बिबटे या प्राण्यांसह इतरही प्राण्यांचे तुम्ही आता पालक बनू शकता. युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतचं एका वाघाचं पालकत्व घेतलं आहे. मुंबईतील नॅशनल पार्क मधील प्राण्यांना दत्तक घेण्याची योजना सुरू झाली आहे. या योजनेद्वारे तुम्ही कोणत्याही प्राण्यांचं वार्षिक पालकत्व घेऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला वार्षिक फी भरावी लागेल.

मुंबईतील नॅशनल पार्कमधल्या वाघाचं पालकत्व सध्या आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे तर, सिंहाचे पालक आहेत हितेंद्र ठाकुर. दुर्मिळ रान मांजराला तेजस ठाकरे यांनी दत्तक घेतले आहे. हे सर्व  शक्य झालंय ते नॅशनल पार्क मधल्या प्राणी दत्तक योजनेमुळे. या योजनेत त्या प्राण्याच्या संगोपनाचा संपूर्ण खर्च त्याचे पालक उचलतील. प्राणी दत्तक योजनेमुळे वनखात्याचा प्राण्यांच्या संगोपनाचा खर्च आता कमी होणार आहे. नॅशनल पार्क मधल्या या रुबाबदार प्राण्यांचं पालकत्व मिळालं, म्हणजे या प्राण्यांना घरी घेऊन जाऊ शकतो असा समज मात्र कुणी करुन घेऊ नये.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close