सुंदर माझं घरचं म्युझिक लाँच केलं स्वानंद किरकरेने

April 11, 2009 2:16 PM0 commentsViews: 6

11 एप्रिल, मुंबई प्रमोद प्रभुलकरच्या सुंदर माझं घर सिनेमा या सिनेमाचं म्युझिक लाँच गीतकार स्वानंद किरकरे यांच्या हस्ते मोठ्या दणक्यात झालं. यावेळी सिनेक्षेत्रातले अनेक दिग्गज उपस्थित होते. सुंदर माझं घरचं म्युझिक आहे मधुराणी गोखले- प्रभुलकरचं. तर मधुराणी गोखले- प्रभुलकरे, साधना सरगम , हमसिका यांच्या आवाजात ही गाणी ऐकायला मिळतात. या गाण्यांचा वेगळा आल्बमही आणला आहे. प्रमोद प्रभुलकर दिग्दर्शित आणि निर्मित या सिनेमाच्या म्युझिक लाँचला मी शिवाजीराजे भोसले बोलतोयची टीम उपस्थित होती. महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकरची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. सुंदर माझं घर हा कौटुंबिक सिनेमा 24 एप्रिलला रिलीज होत आहे.

close