ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचं निधन

May 23, 2014 2:54 PM0 commentsViews: 425

modak

23 मे :  ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं. अनेक चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत गाजलं. अनेक नाटकांनी त्यांनी संगीत दिलंय. त्यांच्या जाण्यानं मराठी चित्रपटसंगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीय. यशवंतराव चव्हाण यांच्यावरचा नुकताच येऊन गेलेला ‘बखर एका वादळाची’ या चित्रपटालाही त्यांनीच संगीत दिलं होतं. नंदू भेंडेच्या रॉकस्टार अल्बमला त्याला संगीत देणारे ते पहिले संगीतकार होते.

आनंद मोडक यांचं योगदान

गाजलेले चित्रपट

 • चौकट राजा
 • तू तिथे मी
 • हरिश्चंद्राची फॅक्टरी

गाजलेली नाटकं

 • तीन पैशाचा तमाशा
 • महानिर्वाण
 • बेगम बर्वे

गाण्यांचे कार्यक्रम

 • अभंगगाथा
 • साजणवेळा
 • शेवंतीचं बन

गाजलेली गाणी

 • एक झोका
 • जाईजुईचा गंध मातीला
 • ही युगायुगांची नाती

शेवटचा चित्रपट

 • यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close