केजरीवालांनी पुन्हा जामीन नाकारला, आणखी 14 दिवसांचा तुरुंगवास

May 23, 2014 4:20 PM0 commentsViews: 1567

3334kejriwal_5423 मे : ‘जामीन घेणार नाही म्हणजे घेणार नाही’ असा हट्ट आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बाळगला असून कोर्टाने खडेबोल सुनावून केजरीवाल यांची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी केलीय. पतियाळा कोर्टात केजरीवाल यांना हजर करण्यात आलं. पण केजरीवाल यांनी जामीन घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.

नितीन गडकरी यांनी केजरीवालांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या खटल्यात जामीन भरायला नकार दिल्याने केजरीवाल यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. पण, आजही त्यांनी जामीन भरायला नकार दिला.

माझा काहीही गुन्हा नाही. मला का अटक करण्यात आली, हेच मला कळत नाही, असं केजरीवाल यांनी म्हटलं. यावर आम्ही तुम्हाला जामीन घ्यायला सांगत नाही, तर फक्त वैयक्तिक बाँड घ्यायला सांगतो आहोत आणि हा नियम ओह, असं कोर्टाने केजरीवाल यांना सुनावले. तर दुसरीकडे केजरीवाल यांच्या समर्थकांनी आजही कोर्टाबाहेर गर्दी केली आणि गडकरींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

केजरी उवाच

“माझा काहीही गुन्हा नाही, मला का अटक करण्यात आली हेच मला कळत नाही”

न्यायाधीशांनी केजरीवालांना सुनावले
“आम्ही तुम्हाला जामीन घ्यायला सांगत नाही, तर फक्त वैयक्तीक बाँड घ्यायला सांगतो आहोत आणि ही एक पद्धत आहे. तुम्हाला समन्स पाठवण्यात आलाय. म्हणजे तुम्ही आरोपी आहात असं नाही.”
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close