मोदींविरोधात फेसबुकवर कमेंट पडली महागात, तरुणाला अटक

May 23, 2014 9:16 PM2 commentsViews: 26640

66goa_modi_facebook23 मे : देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फेसबुकवर कमेंट चांगलीच महागात पडलीय. गोव्यात एका शीपिंग कंपनीसाठी काम करणार्‍या कर्मचार्‍याला भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबुकवर एक विधान केल्याने अटक करण्यात आलीय. देवू चोडणकर असं या कर्मचार्‍याचं नाव आहे.

देवू चोडणकर यांनी मोदींची सत्ता आली तर दक्षिण गोव्यातल्या ख्रिश्चन लोकांची ओळख पुसली जाईल अशी कमेंट त्याने फेसबुकवर टाकली होती. या विधानाबद्दल चोडणकर यांच्याविरोधात एआयआर दाखल करण्यात आली. त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. चोडणकर यांचा हेतू जाणून घेण्यासाठी त्यांची चौकशी करणं आवश्यक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

चोडणकर यांनी काही विधानं डीलिट केली असतील तर त्याचा उलगडा होणंही आवश्यक असल्याचं सांगण्यात येतंय. चोडणकर यांनी मोदी सत्तेवर आल्यास नरसंहार होईल असं लिहिलं होतं, पण ते नंतर डीलिट केल्याचं या एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलंय. भाजपने मात्र या प्रकरणी बोलायला नकार दिला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • narendra

    Enquiry is fine, not arrest.

    • Shailesh

      Bail is disapproved by honorary court, hence arrest is imposed by the court, not by Police or the Government.

close