बदलापुरात सेनेच्या उपशहरप्रमुखांची गोळ्या झाडून हत्या

May 23, 2014 9:51 PM0 commentsViews: 3902

4badlapur_sena23 मे : बदलापूर शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची आज (शुक्रवारी) सकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेमुळे बदलापुरात खळबळ उडाली असून शहरात तणावाचं वातावरण आहे. या हत्येचा निषेध म्हणून बदलापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

गेल्या दोन महिन्यातील बदलापूर शहरातील गोळीबाराची ही तिसरी घटना असल्याने नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. सकाळी पावणे दहाच्या सुमारास कात्रप भागातील आपल्या कार्यालयात मोहन राऊत बसले असता दोन अज्ञात इसम कार्यालयात घुसले आणि त्यांनी राऊत यांच्यावर 7 गोळ्या झाडल्या. ह्यात ते गंभीर जखमी झाले त्यानंतर राऊत यांना डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close